Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सांगली जिल्ह्यात 689 कोरोनामुक्त; नवे 393 रुग्ण; मृत्यू 19
Aapli Baatmi October 04, 2020

सांगली ः जिल्ह्यात आज 689 जण कोरोनामुक्त झाले. नवे 393 रुग्ण आढळले. नव्या कोरोना रुग्णांचा घटता आलेख कायम असून, कोरोनामुक्तांचे प्रमाणही तुलनेने वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास अडीच ते तीन पटीने घटली आहे. जिल्ह्यात आज 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
मृतांमध्ये खानापूर, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यांतील प्रत्येकी दोन, वाळवे तालुक्यातील सहा पलूस आणि मिरज तालुक्यातील एक, महापालिका क्षेत्रातील 3 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 932 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. दैनंदिन चाचण्यांची संख्या सरासरी तीन हजारांवर आहे. त्या तुलनेत रुग्णसंख्याही घटत असल्याचे सुचिन्ह आहे.
एकूण 1120 आरटीपीसीआर चाचण्यांपैकी 86 जण बाधित आढळले. 2179 चाचण्यांपैकी 321 जण बाधित आढळले. जिल्ह्यातील एकूण 34 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये सध्या 1059 रुग्ण उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात 4 हजार 866 रुग्ण आहेत. सध्या 6 हजार 536 रुग्ण बाधित आहेत.
जिल्ह्यातील चित्र
- उपचाराखालील रुग्ण- 6609
- बरे झालले रुग्ण- 30506
- एकूण मृतांची संख्या- 1403
- एकूण बाधित रुग्ण- 38518
- महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 14947
संपादन : युवराज यादव
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 689 corona free in Sangli district; 393 new patients; Death 19
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023