Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
घरफोडी करणारे तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद; पाच घरफोड्यांचा छडा
Aapli Baatmi October 04, 2020

सांगली ः सांगलीसह संजयनगर परिसरात घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. करण रामा पाटील (वय 21), रोहित मधुकर गोसावी (20) व रोहित बाळू सपाटे (19, सर्व रा. वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, एका अल्पवयिनाच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. शहरात आणि संजयनगर पोलिस ठाणे हद्दीतील पाच चोऱ्यांचा छडा लागला असून, संशयितांकडून सुमारे 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी शहरातील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आज पोलिस दिलीप जाधव, विक्रम खोत, जयवंत पवार, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी यांना माहिती मिळाली की, जुना जकात नाका परिसरात संशयित तिघे बसले आहेत. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी शहर पोलिस ठाण्याकडील चार, तर संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका चोरीची कबुली दिली.
शहरातील अप्पासाहेब पाटील नगरमधील ट्रान्स्पोर्ट ऑफिस, गीता स्वीट मार्ट, जुना बुधगाव रस्त्यावरील पानपट्टी, घनशामनगरमधील बंगला, कलानगरमधील फ्लॅटमध्ये चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल व इतर चोरीचा मालही जप्त केला आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
तिघेही सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर घरफोडी-चोरीचे गुन्हे दाखल आहेत. करण पाटील आणि रोहित गोसावी या दोघांवर यापूर्वी प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत. रोहित सपाटे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023