Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर हिंगोलीत मांडल्या शेतकऱ्यांनी व्यथा
Aapli Baatmi October 04, 2020

हिंगोली – साहेब, अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकही अधिकारी, कर्मचारी पाहणी करण्यासाठी आला नाही. आता तुम्ही आले म्हणून सर्वजण हजर झालेत. पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अशा व्यथा अनेक शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर मांडल्या.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शनिवारपासून (ता. तीन) दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शनिवारी औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे भेट देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी येथील शेतकरी प्रभाकर सोळंके यांच्या शेतात जाऊन त्यांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मागील काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस आणि पुरामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस पिकासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शनिवारी केली.
हेही वाचा – जिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह
शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून
विरोधी पक्षनेते दरेकर यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळुंके येथे सोयाबीन व कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड शिवाजीराव जाधव, किसान मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम नागरे, नारायण सोळंके, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उद्धव नागरे, डॉ. दिलीप सांगळे, सखाराम इंगळे, सर्जेराव दिंडे, प्रा. गजानन कुटे आदी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
शेतकरी प्रभाकर सोळंके यांनी व इतर शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या या पिकाला संततधार पाण्याने कोंब फुटले आहेत. इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. अद्याप या पिकाची पाहणी करण्यासाठी एकही अधिकारी गावात फिरकला नाही. आज तुम्ही आले की, सर्व अधिकारी जमा झाले आहेत, असे सांगितले. इतरही शेतकऱ्यांनी पिकासंदर्भात व्यथा मांडल्या.
हेही वाचलेच पाहिजे – कांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ
अधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत खडसावले
यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही पंचनामे का केले नाहीत. तातडीने पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवा, अशा सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजीराव जाधव आदी उपस्थित होते.
(संपादन – अभय कुळकजाईकर)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023