Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Crime Updates : पिंपरी-चिंचवडमधील दिवसभरातील गुन्हे वृत्त
Aapli Baatmi October 04, 2020

सांगवीत महिलेची साडेनऊ लाखांची फसवणूक
महिलेशी मैत्री करीत विश्वास संपादन करून साडेनऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेने पैसे मागितले असता ते पैसे परत न देता महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ली वॉंग (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आरोपीचे नाव आहे. फसवणूक झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या फिर्यादी महिलेशी मैत्री करीत त्यांचा विश्वास संपादन केला. नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. फिर्यादीने पैसे परत मागितले असता परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरात वाहनचोरीच्या तीन घटना
भोसरी, वाकड, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या तीन घटना घडल्या. यात चोरट्यांनी महागड्या दुचाकी लंपास केल्या. नरेश नागेश्वरराव कंडेना (रा. मोशी) यांनी मोशी रोडवरील एका ज्वेलर्सच्या पार्किंगमध्ये उभी केलेली पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने लंपास केली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाणपुलाखाली उभी केलेली योगेश चंद्रकांत कांबळे (रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत. तर अमरूद्दीन सैफ मोहंमद अन्सारी (रा. काळेवाडी) यांनी घरासमोर उभी केलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने पळविली. वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चिखलीत टेंपोची धडक
भरधाव टेंपोने दिलेल्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना चिखलीत घडली. अविनाश बाबू लवटे (रा. पवारवस्ती, चिखली) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश लवटे हे पवारवस्ती येथील सरस्वती शाळेसमोरील रस्त्याने पायी जात असताना भरधाव टेंपोने त्यांना जोरदार धडक दिली. चाक पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर टेंपोचालक घटनास्थळावरून पसार झाला.
नवी सांगवीत महिलेला मारहाण
दारात गाडी लावल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करीत हाताने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना नवी सांगवीत घडली. दत्तात्रेय पाटील व त्याची आई तसेच आशा शरद हेगडे (सर्व रा. नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षा पवार (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दारात गाडी लावल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. कोयत्याने वार केल्याने त्या जखमी झाल्या. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निगडीत लॅपटॉप हिसकावला
रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीकडील लॅपटॉप व मोबाईल हिसकाविल्याची घटना निगडीत घडली. प्रदीपकुमार रतनलाल गोयल (वय 45, रा. सोनीपथ, हरियाना) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निगडीतील ट्रान्सपोर्टनगरमधील पीएमपीएमएल डेपोसमोरील रस्त्याने पायी जात असताना मागून दुचाकीवरून आलेले तिघेजण त्यांच्याजवळ थांबले. त्यांच्याकडील वीस हजारांचा लॅपटॉप व अकरा हजारांचा मोबाईल असून 31 हजारांचा ऐवज हिसकावून पसार झाले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पुनावळेत अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुनावळे येथे घडली. स्वप्नील ससार असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृताचे भाऊ संकेत चंद्रकांत ससार (रा. मु. चांदे, पो. लवळे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील दुचाकीवरून पुनावळे येथील पवनानदीच्या पुलावरून जात असताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला, डोळ्याला, नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023