Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणताहेत, नारायणगाव-खोडद रस्त्यावरील भुयारीमार्गाचा प्रश्न मार्गी लावणार
Aapli Baatmi October 04, 2020

नारायणगाव (पुणे) : नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणावरील नारायणगाव-खोडद रस्त्यावर भुयारी मार्ग करण्यासाठी मी आग्रही आहे. फेज थ्रीमध्ये सुधारित अंदाजपत्रक तयार करून येथील भुयारी मार्गाचे काम केले जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील बैठकीत दिले.
येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बाह्यवळण रस्त्याला नारायणगाव खोडद रस्ता काटकोनात छेदतो. प्राथमिक आराखड्यात या ठिकाणी चौक (जंक्शन) करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाने केले आहे. नारायणगाव खोडद रस्ता रहदारीचा असल्याने व खोडद येथे जीएमआरटी जागतिक दुर्बीण प्रकल्प असल्याने अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग करावा, अशी मागणी या भागातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून करत आहे. मात्र, बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मूळ आराखड्यात बदल करता येणार नसल्याचे कारण सांगण्यात येत होते.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भुयारी मार्गाच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. हा प्रश्न समन्वयाने सोडवण्यासाठी आमदार अतुल बेनके आग्रही होते. या बाबत त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली होती.
दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी शनिवारी नारायणगाव येथे खोडद ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग क्र.60 चे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, सहायक प्रकल्प अभियंता दिलीप शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी डॉ. कोल्हे यांनी भुयारीमार्गाबाबत आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. डॉ. कोल्हे म्हणाले, “”खोडद ग्रामस्थांनी भुयारीमार्गाची केलेली मागणी योग्य आहे. आंतरराष्ट्रीय जीएमआरटी प्रकल्पासाठी खोडद ग्रामस्थांचे योगदान आहे. संभाव्य पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे खोडद रस्त्याला महत्त्व येणार आहे. वास्तविक सुरवातीच्या आराखड्यातच भुयारीमार्गाचा अंतर्भाव करणे आवश्यक होते.” या वेळी डॉ. कोल्हे यांनी फेज थ्री मध्ये नवीन अंदाजपत्रक तयार करून येथील भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्याची सूचना प्रकल्प संचालक चिटणीस यांना केली.
तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा
खोडद रस्त्यावर भुयारीमार्ग करण्यासाठी नव्याने शेतजमीन संपादित करण्याची गरज नाही. उपलब्ध जागेत भुयारीमार्ग करता येईल. पुढील पंधरा दिवसांत फेज थ्रीमध्ये नवीन अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले जाईल. पुढील सात ते आठ महिन्यांत या भुयारीमार्गाच्या कामाला सुरुवात होईल.
– सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग क्र.60
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत भुयारी मार्गाबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले आहे. खासदारांच्या सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, भुयारीमार्ग होईपर्यंत आम्ही खासदार डॉ. कोल्हे आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. भुयारीमार्ग होईपर्यंत आमची संघर्षाची भूमिका कायम राहील.
– गुंडीराज थोरात, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ, खोडद
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023