Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बाजार समित्यातील दलाली बंद होईल, मात्र काँग्रेस, `राष्ट्रवादी`चे त्यावर लक्ष : रावसाहेब दानवे
Aapli Baatmi October 04, 2020

लातूर : केंद्र शासनाने शेती विषयक सुधारणा विधेयके मंजूर केली आहेत. या पुढे एका बाजुला काटा अन दुसऱया बाजूला नोटा असे सरकारचे धोरण आहे. या कायद्यामुळे बाजार समित्यातील दलालाची पद्धत बंद होवून शेतकऱयांना उर्जीत अवस्था प्राप्त होण्य़ास मदत होणार आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱयात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
या दोन्ही पक्षाचे बाजार समितीच्या माध्यमातून मिळणाऱया बाजार शुल्कावर लक्ष आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असे राज्य सरकार सांगत असले तरी याचे त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी रविवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून आपटल्यानंतर काळे तोंड झालेले काँग्रेस आता गोरे करता येते का? हे पाहत आहे. लोकासमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्य़ा आहेत. नवीन कायदेही त्याचा एक भाग आहे. पण काँग्रेसकडून शेतकरयात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचा पंतप्रधान, कृषीमंत्री तसेच न्याय व्यवस्थेवरही भरवसा नाही. त्यामुळे लोकांचा तरी त्यांच्यावर कसा भरवसा बसेल असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
नवीन कायद्यामुळे बाजार समित्या रद्द होणार नाहीत. पण प्रचलित विक्रीची पद्धत बंद होईल. कोणत्याही व्यापाऱयाला शेतकऱयाचा माल खरेदी करता येईल. यातून शेतमालाला चांगले भाव मिळतील. गुंतवणूकादर पुढे येतील. यावर सरकारचे नियंत्रण असणारच आहे. शेतकऱयांना उर्जित अवस्था येईल. बाजार समितीत्यातील दलाली बंद होईल. बाजार शुल्कावरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष आहे. हे शुल्क वाटून घेण्यासाठी कायद्याला विरोध केला जात आहे. कायदा पाळावा लागेल अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही श्री. दानवे पाटील यांनी यावेळी दिला.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. योग्य बाजूच मांडली गेली नाही. या समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार भागवत कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार सुजितसिंह ठाकूर, गोविंद केंद्र, गुरुनाथ मगे आदी उपस्थित होते.
राहूल गांधी तोल जावून पडले
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील घटनेसंदर्भात सरकार गंभीर आहे. काँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केलेली नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करतो. गर्दीत जायची राहूल गांधी यांना सवय नाही. आता ते गर्दीत गेले. त्यामुळे तोल जावून ते पडले, अशा शब्दात श्री. दानवे पाटील यांनी उत्तरप्रदेश सरकारची पाठराखण केली.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023