Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
...स्मशानभूमीतच त्याने ठोकलाय मुक्काम ! ...कशासाठी वाचा
Aapli Baatmi October 04, 2020

इस्लामपूर (जि. सांगली)- गेले महिनाभर इस्लामपूरच्या एकाने कापुसखेड रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीतच मुक्काम ठोकला आहे. घरी पत्नी आणि मुलीला त्रास नको म्हणून तो दिवसरात्र स्मशानभूमीत आलेले कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह दहन करण्याचे काम करत आहे. दिलीप मनोहर सावंत असे त्याचे नाव.
मागील महिन्यात एक धक्कादायक बातमी सर्वत्र व्हायरल झाली की, अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके कुत्र्यांनी तोडले. ही घटना अनावधानाने घडली असली तरी ती समर्थनीय नक्कीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका देण्याचा निर्णय घेतला. परंतु कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह जाळण्यासाठी कोण पुढे येणार? परंतू बेरोजगार बनलेला दिलीप सावंत पुढे आला. त्याने ही जबाबदारी घेतली. नगरसेवक सदानंद पाटील यांच्याकडून त्याला ही माहिती मिळाली. घरी पत्नी आणि मुलगी असून राजारामनगर मध्ये तो वास्तव्य करतो.
खासगी वाहनचालक म्हणून कसेबसे पोट भरणारा दिलीप कोरोनाच्या काळात पूर्णतः मोडून पडला होता. परंतू या ठेक्याने त्याच्या जगण्याला दिलासा मिळाला. ठेक्याचे फॉर्म भरण्यासाठी त्याच्या खिशात चारशे रुपयेही नव्हते, ती रक्कम डॉ. शेंडे यांनी स्वतःच्या खिशातील भरली.
मूळ गाव पलूस तालुक्यातील सावंतपुर आहे. पोटापाण्याच्या धडपडीत गेली वीस वर्षे इस्लामपूरात राहतो. कोरोना संसर्गाचा कहर वाढलेला आणि स्वतःचे नातेवाईकही ज्या मृतदेहाजवळ जायला घाबरत होते, त्या काळात दिलीपने दिवस-रात्र जागून अंत्यविधी केले. एकदा तर सलग 19 मृतदेह त्याला दहन करावे लागले. त्याने सहकारी शनिदेव बिराजदार, समीर कांबळे आणि माणिक वाघमारे यांच्या सहकाऱ्यांच्यासमवेत न थकता ते दहन केले.
सध्या संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी दिवसाला सरासरी चार ते सहा मृतदेह दहन करावे लागतात. पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, अधिकारी अनिकेत हेंद्रे, साहेबराव जाधव, दिलीप कुंभार यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले.
मालकावरच अंत्यसंस्काराची वेळ-
दिलीपकडे ठेका आल्यापासून त्याने गेल्या महिन्यात 120 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत. पूर्वी ज्या मालकाकडे चालक म्हणून काम केले, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले हे सांगताना सावंत यांचे डोळे पाणावले.
“”कोरोनामुळे जगणे नको झाल्याच्या काळात ही संधी चालून आली. नशिबाची साथ म्हणायची. खिशात चारशे रुपयेही नसताना मला हे काम त्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांमुळे मिळाले, त्यांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. एका अर्थाने मला देवाने ही सेवाच करण्याची संधी दिली आहे, असे मी मानतो.”
-दिलीप सावंत
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023