Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Corona Updates : आतापर्यंत अडीच लाख पुणेकरांनी हरवलं कोरोनाला!
Aapli Baatmi October 05, 2020

पुणे : गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत अडीच लाख पुणेकरांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवार अखेरपर्यंत (ता.४) पुणे जिल्ह्यातील एकूण दोन लाख ५० हजार ८०१ पुणेकरांनी कोरोनाला हरवले आहे. जिल्ह्यात रविवारी २ हजार ३७३ नवे रुग्ण सापडले आहेत.
सलग चौथ्या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या २० हजार ५१२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. शनिवारी (ता.३) हाच आकडा २१ हजार १५९ एवढा होता. याशिवाय १६ हजार ३१ जण घरातच उपचार घेत आहेत.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत २ हजार ८७० कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ४२८ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ६९१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५९१, नगरपालिका क्षेत्रातील ८८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ७२ रुग्ण आहेत.
रविवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी- चिंचवडमध्ये ५४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५९६, नगरपालिका क्षेत्रात १७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रात ६५ नवे रुग्ण सापडले आहेत.
– पंतप्रधान मोदी पुणेकरांशी साधणार संवाद; लोकमान्य टिळक शताब्दीनिमित्त वेबीनार!
तसेच दिवसभरात ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ३८ जण आहेत.पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी १३ आणि नगरपालिका क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शनिवार (ता.३) रात्री नऊ वाजल्यापासून रविवार (ता.४) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
रविवारअखेरपर्यंत जिल्ह्यात ६ हजार ८१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार ७९६, पिंपरी-चिंचवडमधील १
हजार ३६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ८८, नगरपालिका क्षेत्रातील ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 178 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील २९६ जण आहेत.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023