Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मावळात दिवसभरात ७३ पॉझिटिव्ह: रुग्ण संख्या पाच हजाराच्या घरात
Aapli Baatmi October 05, 2020

वडगाव मावळ – मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात ७३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ९८१ झाली आहे. तळेगावातील संख्या दीड हजाराच्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंत १७१ जणांचा मृत्यु झाला आहे. ४ हजार १२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ५३ जणांना घरी सोडण्यात आले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७३ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ४२, तळेगाव दाभाडे येथील १५, वडगाव येथील सहा, इंदोरी येथील दोन, कामशेत, टाकवे बुद्रुक, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे, डोंगरगाव, कान्हे, वाकसई व कार्ला येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.
Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 20 जणांचा मृत्यू
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ९८१ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार ९२७ व ग्रामीण भागातील २ हजार ५४ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ५०५, लोणावळा येथे १ हजार १२४ व वडगाव येथे रुग्णसंख्या २९८ झाली आहे. आत्तापपर्यंत १७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार १२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ५३ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६९० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४७६ लक्षणे असलेले तर २१४ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४७६ जणांमध्ये ३७८ जणांमध्ये सौम्य तर ९३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. पाच जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६९० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023