Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पंतप्रधान मोदी पुणेकरांशी साधणार संवाद; लोकमान्य टिळक शताब्दीनिमित्त वेबीनार!
Aapli Baatmi October 05, 2020

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि ‘आयसीसीआर’तर्फे लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘आत्मनिर्भर भारत आणि नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम 7 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता होणार आहे.
– महत्त्वाची बातमी : आंबेगावात घेता येणार निसर्गोपचार पद्धतीने उपचार
7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, पालकांसह इतरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केले आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले होते, त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे यामध्ये संबोधित करणार आहेत.
या वेबिनारसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, त्यांना कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी कार्यक्रमाची रूपरेषा व लिंक दोन पाठवण्यात येणार आहे. https://forms.gle/5yaUMHNur9hxd4bV7 या लिंकवर माहिती भरून नोंदणी करावी.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023