Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
शिराळा तालुक्यात ऊसाचे फडच बिबट्यांची आश्रयस्थाने
Aapli Baatmi October 05, 2020

शिराळा : चांदोली जंगलापासून तब्बल साठ किलोमीटर अंतरापर्यंत काही दिवसांत बिबटे दिसू लागलेत. ऊसाचे फडच बिबट्यांची आश्रयस्थाने झालीत. वर्षभरात दर आठ-पंधरा दिवसाला कोणत्या ना कोणत्या गावांत बिबट्या दिसल्याची बातमी येते. इतका त्यांचा सहज वावर झाला. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शिवारात वावरावे लागत आहे.
आत्तापर्यंत शिराळा तालुक्यातील मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापूर, कुसाईवाडी, मांगले, मिरुखेवाडी, बेरडेवाडी, निगडी, शिराळा, मोरणा धरण, कांदे, कापरी आदी परिसरात बिबट्यांचे माणसे व पाळीव प्राण्यावर हल्ले झालेत. गेल्यावर्षी गोरक्षनाथ मंदिराजवळील बाह्य वळण रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकल वर उडी मारून शिराळा येथील अभिजित कुरणे याला पायावर पंजा मारून जखमी केले होते. पाच महिन्यांपूर्वी चरण येथील युवक व एक महिला, दोनच दिवसांपूर्वी मांगले येथे युवकावर हल्ला झाला. जून महिन्यात घागरेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या व दोन दिवसांपूर्वी मांगले येथे बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
पश्चिम घाटात बिबट्यांची संख्या वाढली आहे. ते जंगलाबाहेर पडत आहेत. बाहेरही वाढते ऊसमळे, त्यामधील ससे व डुक्कर असे मुबलक खाद्य त्यांच्यासाठी आहेच. तो सर्व वातावरणात राहू शकतात. ऊसमळ्यातील वास्तव्यही त्यांना सुरक्षित वाटते आहे.
– एस. एल. झुरे, निवृत्त विभागीय वनाधिकारी
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023