Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उस्मानाबाद जिल्ह्यात ५८ जणांना कोरोनाची लागण, सहा रुग्णांचा मृत्यू
Aapli Baatmi October 05, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता.पाच) ५८ नवीन रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. सोमवारी एकाच दिवशी १९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआरचे १५५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७ पॉझिटिव्ह आले आहेत, तर २१३ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४१ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सहा जणांचा मृत्यु झाल्याने मृत्युचा दर ३.१५ टक्के इतका वाढला आहे.
कपाशी, सोयाबीन पाण्यात; शेतकऱ्यांनी शेतातील पावसाचे पाणी काढण्यासाठी लावले…
कोरोना होण्याचे प्रमाण घटल्याचे दिसत असले तरी मृत्यूचा दर मात्र कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता ७९.४४ टक्के एवढे वाढल्याने निश्चितपणाने ही बाब दिलासादायक आहे. कोरोना होण्याचे प्रमाण अजूनही २० टक्के असल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये पाच हजार ७६१ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर एक हजार ९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ५८ रुग्णांमध्ये वाशी व भूम येथील प्रत्येकी १३ जण आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कळंब नऊ, परंडा सात, अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकेरी आकडा आल्याने काहीशी चिंता कमी झाल्याचे दिसून येत आहे.
दिव्यांगांचे ‘भीक मागो’ आंदोलन, औसा नगरपालिका घेणार का दखल?
सहा जणांचा मृत्यु
वाशी तालुक्यातील मांडवा येथील ८५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. कळंब येथील दत्त नगरमधील ६० वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. भूम तालुक्यातील आष्टा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. परंडा तालुक्यातील उंडेगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. वाशी तालुक्यातील गिरवली येथील ५५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयातील चित्र
कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या- १२८१८
बरे झालेले रुग्ण- १०१८२
उपचाराखील रुग्ण- २२३२
एकुण मृत्यु – ४०४
आजचे बाधित – ५८
आजचे मृत्यु – ०६
संपादन – गणेश पिटेकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023