Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
जिल्ह्यासाठी २५ हजार कोरोना चाचणी किट ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान गतिमान होणार - डॉ. निळकंठ भोसीकर -
Aapli Baatmi October 05, 2020

नांदेड – आरोग्य विभागाने कोरोना चाचणीसाठी २५ हजार कोरोना किटची मागणी केली होती. चार दिवसापूर्वीच जिल्ह्यासाठी २५ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान मोहिम अधिक वेगाने राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य पथकाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशभरातील अतिसंवेदनशिल जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा दर कमी असल्याने व मृत्यूचे दर अधिक असल्याने मृत्यूदर आटोक्यातयावा आणि दिवसाला कमीतकमी दीड हजार कोरोना टेस्ट झाल्या पाहिजे. यासाठी केंद्राच्या आरोग्य पथकाने राज्य सरकारला सुचना केल्या होत्या. त्यानुसार काही दिवस जिल्ह्यात दिवसाला एक हजार ५०० चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु कोरोना चाचणीसाठी लागण्याऱ्या किटची कमतरता भासू लागल्याने आठवडाभरापासून कोरोना चाचण्यांची संख्येत घट झाली होती.
हेही वाचा- ‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग
नागरीकांनी स्वःताहून पुढे यावे
जिल्ह्यास कोरोना चाचणी किट मिळाल्यास टेस्ट वाढविणे शक्य होईल, या हेतुने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी २५ हजार किटची मागणी केली होती. त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री व हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमादार बालाजी कल्याणकर यांनी देखील कोरोना चाचणीसाठी मागणी लावून धरली होती.
हेही वाचले पाहिजे- मॉं जिजाऊंचे संस्कारच बलात्काराच्या घटना थांबवू शकतात- डॉ गंगाधर घुटे
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
सर्वांच्या मागणीमुळे जिल्ह्यास २५ हजार कोरोना चाचणी किट उपलब्ध झाल्या असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वःताहून तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023