Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!
Aapli Baatmi October 06, 2020

पुणे : गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली पुणे-लोणावळा लोकल सेवा १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पोलिस आयुक्तालय आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, तूर्तास ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे. तर प्रवासासाठी प्रवाशांना क्युआर कोड आधारित पोलिस पास बंधनकारक आहे.
– MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘अनलॉक’च्या नवीन नियमावलीत लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या लोकल सेवेच्या धर्तीवर पुण्यातील लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या. त्यात सर्व गोष्टींचा उहापोह करून, सेवेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पुणे स्थानकातून लोणावळ्याला जाण्यासाठी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आणि सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी गाडी सुटेल. तर, लोणावळ्याहून पुण्यात येण्यासाठी सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी आणि सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी गाडी सुटेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
– Breaking : हाथरसमध्ये मोठं षडयंत्र; उत्तर प्रदेश पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल
लोकलच्या वेळा
पुणे स्थानकातून सुटणार : स. ८.०५ आणि सायं. ६.०५
लोणावळा स्थानकातून सुटणार : स. ८.२० आणि सायं. ५.०५
प्रवाशांसाठी नियमावली
– प्रवाशांना क्युआर कोड आधारित पोलिस पास बंधनकारक
– राज्य सरकार, केंद्र सरकारी कार्यालये, बँका, खासगी रुग्णालये आदींचे कर्मचारी प्रवासाला पात्र
– कर्मचाऱ्यांनी www.punepolice.in या लिंकवर जाऊन कार्यालयाचे पत्र, आयकार्ड, फोटो, फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे.
– महापालिकेच्या माध्यमातून प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023