Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सकाळ इम्पॅक्ट : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी उपशिक्षणाधिकाऱ्यालाही अटक
Aapli Baatmi October 06, 2020

नागपूर : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी अटकसत्र सुरूच असून, यावेळी चक्क उपशिक्षणाधिकारीच जाळ्यात अडकला आहे. रवींद्र आबासाहेब सावंत (रा. कामेरी, जि. सांगली) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात रवींद्रच्या भावालाही मानकापूर पोलिसांनी अटक केली होती. रवींद्रला सोमवारी न्यायालयात हजर करून १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दैनिक ‘सकाळ’ने या प्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, हे विशेष.
मानकापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर मानकापूर पोलिसांचे पथक सांगलीला रवाना झाले होते. त्यांनी तीन ऑक्टोबर रोजी रविंद्रला त्याच्या राहत्या घरून अटक केली. पोलिसांना पाहताच रवींद्रने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
सविस्तर वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
नागपुरात सोमवारी आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. मानकापूर पोलिस त्याची कसून चौकशी करीत असून, चौकशीत आणखी काही नावे किंवा मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रवींद्रने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केल्यानंतर तो वर्धा येथे शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाला होता. त्याची अलीकडेच कोल्हापूर येथे बदली झाली होती. तिथे तो सध्या उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होता. अधिकाऱ्यांना रवींद्रने सादर केलेल्या प्रमाणपत्रावर शंका आल्याने त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले होते.
पडताळणीत त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर तक्रार करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रवींद्रचा भाऊ संजय सावंतलाही याच प्रकरणात मानकापूर पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून कारागृहाची हवा खात आहे. बीएस्सी झालेल्या व पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या संजयनेही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०१६ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षा पास केली होती. त्याची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवडही झाली होती. मात्र त्याच्याही प्रमाणपत्रातील तारखेत खाडाखोड आढळून आली होती.
राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून खेळाडूंनी राज्यातील अनेक खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नऊ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. या बोगस खेळाडूंमध्ये नागपूर विभागातील अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे उघडकीस आणले होते. उपायुक्त (परिमंडळ २) विनिता साहू व मानकापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कृष्णा शिंदे, राजेश वरठी, संतोष राठोड, राघोजी चिलघर व हितेश यांनी वरील कारवाई केली.
संपादन : अतुल मांगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023