Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
हॉटेलमध्ये फोडणीचा घमघमाट
Aapli Baatmi October 06, 2020

कोल्हापूर ः सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हॉटेल मालकांनी आज सुटकेचा निःश्वास सोडला. हॉटेलचे दरवाजे उघडले खरे; पण पहिल्याच दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने गिऱ्हाईकांची मात्र त्यांना प्रतीक्षा करावी लागली. मार्चच्या आठवड्यात लॉकडाऊनमुळे बंद झालेली हॉटेल तसेच बार आजपासून पूर्ववत सुरू झाले.
सहा महिन्यांपासून गिऱ्हाईकांशी तुटलेले नाते, गावी गेलेले कामगार आणि पुढे व्यवसाय स्थिरावेल की नाही अशा प्रश्नांना सामोरे जात हॉटेलची शटर खुली झाली. आजची सकाळ उजाडताच हॉटेलमध्ये लगबग सुरू झाली. पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू करण्याची परवानगी असल्याने एकाच टेबलवर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. सॅनिटायजरची व्यवस्था केली गेली. मिसळ, वडापाव, कांदा भजी, पोहे उप्पीट, उपवासाचा शाबूवडा असे खाद्यपदार्थ तयार झाले. शाकाहारी हॉटेलमध्ये सकाळपासून दुपारच्या ताटांची व्यवस्था सुरू झाली. नेमका आज सोमवार आणि जोडून संकष्टीमुळे उपवासाचे पदार्थ आणि चहावर हॉटेलचालकांना आजचा दिवस काढावा लागला. कोल्हापुरात रविवार, बुधवार, शुक्रवार तसेच शनिवार या दिवशी मांसाहारी भोजनाला पसंती दिली जाते. त्यात बुधवार आणि रविवार हे हक्काचे दिवस. सोमवार, मंगळवार तसेच गुरुवारी शाकाहारी भोजनाला पसंती दिली जाते.
सहा महिन्यांपासून शटर डाऊन असल्याने बॅंकांचे हप्ते, परवाना शुल्क, पाणीबिल, विजेचे बिल कसे भागवायचे असे असंख्य प्रश्न आजही हॉटेलमालकांसमोर उभे आहेत. कामगार माघारी परतण्याच्या मानसिकतेत नाहीत. शहरात गेला आणि कोरोनाची लागण झाली तरी करायचे काय? उपचाराचा खर्च काही परवडणारा नाही. पोरांना नेणार असाल तर न्या; पण काय झाले तर जबाबदारी तुमची असेल असा इशाराच कामगारांच्या पालकांकडून मालकांना दिला जात आहे. साफसफाई, ऑर्डर, रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ तयार करणे, देखभाल दुरुस्ती, दररोज हिशेब अशी जबाबदारी कामगार तसेच व्यवस्थापक मंडळीवर असते. हळूहळू का असेना सुरवात तरी झाली इतकाच काय तो आनंद हॉटेल मालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
उशिरा का असेना; पण हॉटेल सुरू झाली, याचा आनंद आहे. कामगारांची कमतरता आहे. जे कर्मचारी हाताशी आहेत त्यांना सोबत घेऊन हॉटेल सुरू झाली आहेत. हळूहळू स्थिती पूर्वपदावर निश्चितपणे येईल.
– उज्वल नागेशकर, अध्यक्ष, जिल्हा हॉटेल मालक संघ
संपादन ः रंगराव हिर्डेकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023