Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पंढरपूरकडे जाणारा 65 लाखांचा गांजा पुणे 'कस्टम'ने तांदूळवाडीजवळ पकडला
Aapli Baatmi October 06, 2020

सोलापूर : आंध्र प्रदेशातील एका ठिकाणाहून सोलापूरमार्गे पुण्याकडे निघालेल्या वाहनातील (एम.एच. 13 सीयू 3192) तब्बल 65 लाख रुपयांचा गांजा पुण्यातील कस्टम विभागाच्या पथकाने पकडला.
ठळक बाबी…
- आंध्र प्रदेशातील एका गावातून पंढरपुरकडे निघाला होता 65 लाखांचा गांजा
- पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी तांदूळवाडीजवळ (ता. दक्षिण सोलापूर) सुरु केली वाहनांची तपासणी
- नळदूर्ग- सोलापूर रोडवरील संतोष ढाब्याजवळ एक वाहन थांबवून चालक झाला होता पसार
- कस्टमच्या पाच सदस्यीय पथकाने वाहनाची कसून तपासणी केली
- वाहनाच्या केबिनजवळील पोकळीत लपवून ठेवले होते गांजाचे सहा प्लास्टिक पॅकेट
- पुणे कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अलोक सिंग यांच्या पथकाची कारवाई
एका वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी पाच जणांचे पथक नळदूर्ग- सोलापूर रोडवरील संतोष ढाब्याजवळ पोहचले. दरम्यान, त्यावेळी आंध्र प्रदेशातून एका वाहनाच्या माध्यमातून हा गांजा वाहून नेला जात होता. सोलापूरहून पंढरपूरकडे तो गांजा घेऊन जात होते. सहायक आयुक्त अलोक सिंग यांच्या पथकाने त्या ठिकाणच्या तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी ते वाहन 500 मीटर अंतरावर थांबले होते आणि वाहनचालक त्यातून पसार झाला होता. वाहनाची तपासणी करुनही सुरवातीला गांजा मिळाला नाही. त्यानंतर वाहनाच्या केबिनजवळील ताडपत्रीच्या पोकळीत पाहणी केली. त्यावेळी गांजाने भरलेले प्लास्टिकचे पॅकेट दिसून आले. कस्टम अधिकाऱ्यांनी वाहनासह 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुणे कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. 4) दुपारी चारच्या सुमारास पार पडली.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ‘Customs’ seized Rs 65 lakh worth of cannabis on its way to Pandharpur near Tandulwadi
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023