Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
जेवण तयार आहे..! पुन्हा एकदा वेटरची लगबग सुरू...
Aapli Baatmi October 06, 2020

सांगली : “फक्त पार्सल सुरू आहे…’ ही पाटी आज कोपऱ्यात फेकून देण्यात आली. “वेलकम, जेवण तयार आहे’, ही पाटी पुन्हा थाटात उभी राहिली. हाती चिटोऱ्यांची डायरी घेऊन पुन्हा मॅनेजर टेबलाजवळ उभा राहिला आणि पुन्हा एकदा वेटरची लगबग सुरू झाली… “भावा गरम काय हाय’, हा सहा महिने कानावर न पडलेला शब्द ऐकून हॉटेल मालकाने तृप्तीची ढेकर दिली अन् कागदी पिशवीतून पार्सल नेऊन वैतागलेला खवय्या शर्ट कोपरापर्यंत मागे सारून गरमागरम जेवणावर ताव मारायला रिकामा झाला.
महापालिका क्षेत्रात छोटी-मोठी साडेतीनशेहून अधिक हॉटेल्स आहेत. ढाब्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर हॉटेल सुरू झाली आणि किचनसह सारा माहोल गजबजला; पण… हॉटेल सायंकाळी सातला बंद करण्याचा नियम जाचक असल्याने व्यावसायिक थोडे नाराज आहेत. त्यांनी रात्री दहापर्यंत तरी ती सुरू ठेवायला मान्यता द्या, अशी मागणी केली आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 24 मार्चला देशात लॉकडाउन सुरू झाला. त्याला सहा महिने उलटले. व्यापार, उद्योगासह बहुतांश क्षेत्रातील “अनलॉक’मध्ये व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आले; मात्र हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला. पार्सल सेवा सुरू होती; मात्र केवळ 10 टक्के उलाढाल झाली. अनेकांनी हॉटेलचे कुलूप काढलेच नाही. आता सहा महिन्यांनी हॉटेल, बार पुन्हा सुरू झाले. त्यातही अनेक प्रश्न आहेत.
नियमांचे “मेनू कार्ड’
हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक असतील. एका टेबलावर दोनच व्यक्ती बसतील. कुटुंब असेल तर काय? या प्रश्नावर “थोडी ढील’ असेलच. प्रवेश करतानाच सॅनिटायझरचा वापर, जेवण सुरू करेपर्यंत आणि संपल्यानंतर लगेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. आज पहिल्या दिवशी खवय्यांची तुरळक गर्दी होती. संकष्टी, सोमवार, त्यात अधिक मास असा नियमबद्ध दिवस होता. त्यामुळे मांसाहारी खानावळी, हॉटेल बंदच राहिली. उद्यापासून तेथे रेलचेल वाढेल, अशी अपेक्षा आहे.
हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शैलेश पवार म्हणाले, “”गेल्या चार दिवसांपासून स्वच्छता, निर्जंतुकीकरण, साफसफाई सुरू होती. कोरोनाच्या भीतीने कामगार गावी परतले होते. त्यांना परत बोलावले आहे. ते येईंपर्यंत पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू होणार नाहीत. तोपर्यंत उपलब्ध कामगार जसे चालवतील तसे चालवायचे.”
“हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्यांची दुपारची संख्या 30 टक्के आणि रात्रीची 70 टक्के असते. सायंकाळी सातपूर्वी कोणी जेवत नाही. एक वेळ हॉटेल बंद राहील, मग 30 टक्के ग्राहकांसाठी ते चालवायचे का? दुकाने बंद करून व्यापारी, कार्यालय सुटल्यावर कर्मचारी, उद्योग बंद करून उद्योजक घरी जातील. मग सहकुटुंब जेवायला येतील. त्यामुळे दहापर्यंत परवानगी हवीच.”
– सतीश कुंभार, खाद्य-पेय विक्रेते मालक-चालक संघटना.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023