Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
हिंगोलीत उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
Aapli Baatmi October 06, 2020

हिंगोली : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्त व उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीत सोमवारी (ता. पाच) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
हाथरस मधील पिडीत मुलगी व त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज देशभर सत्याग्रह करण्यात आले त्यानुसार आज हिंगोलीत जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळ्या पट्टया बांधून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करुन सत्याग्रह आंदोलन केले. प्रत्येकांच्या हातात पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे असे फलक होते.
हेही वाचा – हिंगोली आगारात कोरोना संकटात काळात कर्मचाऱ्यांचे सव्वा दोन कोटीचे वेतन थकले
अनेकांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते दिलीप देसाई शहराध्यक्ष बापुराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, अजगर पटेल, शोभा मोगले, मधुकर जामठीकर, डॉ.राजेश भोसले, नामदेव बुद्रुक, एल.जी घुगे, ध्रुपत पाईकराव, केशव नाईक, विलास गोरे, श्रीराम जाधव, बालाजी पारिसकर, जिल्हा परिषद सदस्य सतिश पाचपुते, भगवान खंदारे, एस. पी. राठोड, कैलाश साळुंके, पंकज जाधव, सुमेध मुळे, अजगर पटेल, संतोष राजेगोरे, नंदकिशोर कदम राजाराम खराटे, विशाल घुगे आबेदअली जहागीरदार, बंटी नागरे, गजानन कवडे, अशोक बेले, देविदास ससाणे, चंद्रकांत डुकरे, संजय लोमटे आदींची उपस्थिती होती.
संपादन – प्रल्हाद कांबळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023