Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
बँक प्रशासन हादरले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्टेट बँकेत
Aapli Baatmi October 06, 2020

सेलू (जिल्हा परभणी) : सेलू तालुक्यातील शेतकर्यांसह,सर्व सामान्य नागरिकांना पिक कर्ज व इतर व्यवहारासाठी नेहमी अडवणुक करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी(ता.५) सकाळी सेलू शहरातील भारतीय स्टेट बँकेत जाऊन तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी साधी व सोपी पद्धत अवलंबविली जावी अशी मागणी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दोन दिवसांपासून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत शिवारातील खरिपाच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची पहाणी करीत आहेत.दरम्यान या दौर्यादरम्याण सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सेलू तालुक्यातील शेतकर्यांची व सर्वसामान्य नागरिकांची स्टेट बँकेकडूण अडवूनक होत असल्याची तक्रार केल्या.या मुळे विरोधी पक्षनेते श्री दरेकर यांनी सोमवारी (lता. पाच) सकाळी स्टेट बँकेत दाखल होऊन सुचना दिल्या.
हेही वाचा – अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही
कर्जासाठीची अडवणुक तात्काळ थांबवा.
बँकेद्वारे पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे अधिकारी पदोपदी शेतक-यांची अडवणुक करीत असल्याचा तक्रारी आहेत.असे प्रकार तातडीने थांबवा,असा इशारा विरोधी पक्षनेते दरेकर यांनी बँक व्यवस्थापनास देवून कर्जासाठीची अडवणुक तात्काळ थांबवा. सर्वसामान्य शेतक-यांना वाईट वागणुक देऊ नका, असे सुनावून सर्वसामान्य शेतक-यांच्या मदतीकरिता तत्परतेने पुढे या पिक कर्ज वाटपात सरळ सुटसुटीत अशी सोपी पध्दत राबवा, असेही श्री दरेकर यांनी बँक प्रशासनला सुनावले.
या आमदारांची होती उपस्थिती
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे या बँकेत सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे एक तास ठिय्या मांडून होते. या वेळी जिंतूर/सेलू विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे), भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, रविंद्र डासाळकर, कपिल फुलारी यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. प्रवीण दरेकर यांच्या या ठिय्या आंदोलनाने बँक व्यवस्थापन चांगलेच हादरुन गेले.
संपादन – प्रल्हाद कांबळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023