Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...
Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...
November 29, 2023
तब्बल चोवीस तासांनंतर लागला शोध; किशोर सागरवर गेलेल्या तरुणाची मित्रांसोबतची सहल शेवटचीच!
Aapli Baatmi October 06, 2020

नाशिक / देवळा : रामेश्वरजवळील किशोर सागर जलाशयात मित्रांसमवेत पोहण्यासाठी युवक गेला होता, त्यावेळी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले.परंतु अद्यापही काहीच पत्ता लागला नव्हता. त्यानंतर…
तब्बल चोवीस तासांनंतर लागला शोध
सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील युवक केशव अहिरे (वय २३) हा रामेश्वरजवळील किशोर सागर जलाशयात मित्रांसमवेत पोहण्यासाठी रविवारी (ता. ४) गेला असता, दुपारी तीनला पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले. परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळून न आल्याने शोधकार्य थांबविले होते. सोमवारी सकाळी मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. शकील अहंमद ऊर्फ तैराक व त्यांच्या सहा जणांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते ‘घबाड’; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन
चोवीस तासांनंतर शोधण्यात यश
रामेश्वर (ता. देवळा)जवळील किशोर सागर धरणाच्या जलाशयात बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सोमवारी (ता. ५) सापडला. मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोवीस तासांनंतर त्यास शोधण्यात देवळा पोलिसांना यश आले.
हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023