Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कलाकारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करण्यावर उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांची सहमती
Aapli Baatmi October 06, 2020

पुणे : आरोग्य विमा असो की राहायला घर, कोणताही कलाकार असला, तरी त्याला या सुविधा मिळण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलाकार कल्याण मंडळाची स्थापना करण्याची मागणी होऊ लागली असून, राज्य सरकारने अनुकूलता दर्शविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी या मुद्द्यावर सहमती दर्शविली आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यातील दीडशेहून अधिक कलाकार संघटनांनी एकत्र एक महाकलामंडळ स्थापन केले आहे. कलाकारांच्या समस्या आणि मागण्या सरकार दरबारी एकत्रितपणे मांडण्याचे काम हे मंडळ करणार आहे. या मंडळाच्या स्थापनेवेळी कलाकारांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटले. यादरम्यान कलाकार कल्याण मंडळाची स्थापन करण्याचा मुद्दा पुढे आला होता.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आमदार अतुल बेणके, लक्ष्मीकांत खाबिया, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, मालती इनामदार आदींनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुक यांची नुकतीच भेट घेतली. कलाकार कल्याण मंडळ स्थापनेच्या मुद्द्यावर तीत सविस्तर चर्चा झाली. देशमुख यांनी देखील त्यावर सकारात्मक मत व्यक्त करून हे मंडळ स्थापन करण्यास सहमती दर्शविली. नंतर या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही मंडळास अनुकूलता दर्शवली आहे.
शेतकरयांपुढे एकीकडे असेल ‘काटा’ दुसरीकडे नोटा : रावसाहेब दानवे
राजेभोसले “सकाळ’शी बोलताना म्हणाले, “”अर्थमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी कलाकार कल्याण मंडळ स्थापन करण्यास सहमती दर्शविल्याने त्यास राज्य सरकारची तत्त्वत: मान्यता असल्याचे आम्ही समजतो. यातून कलाकारांच्या अनेक वर्षांचे प्रश्न मार्गी लागतील आणि त्यांच्या कल्याणासाठी एक खास व्यवस्था देखील यामुळे उभी राहील.”
तमाशा फडाच्या मालकांना पूर्वी वार्षिक अनुदान मिळत असे. मोठ्या फडास आठ लाख रुपये आणि लहान फडास चार लाख रुपये मिळत. हे बंद झालेले अनुदान पुन्हा मिळावे, अशी मागणी या बैठकीत चर्चा झाली. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही सांस्कृतिक मंत्र्यांनी दिली आहे.
”कोणत्या कलाप्रकारात किती मराठी कलावंत आहे, याची नोंदणी तसेच कलाकारांचा आयुर्विमा, त्यांच्यासाठी घरकुल योजना, विविध समस्यांचे निराकरण तसेच आपत्कालीन परिस्थितीत कलाकरांना आर्थिक मदत देण्याचे काम कलाकार कल्याण मंडळ करील, अशी मंडळाची रचना अपेक्षित आहे. ”
– मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023