Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कुरकुरणारी सायकल अन् थरथरणारे हात; वयाच्या ८२ व्या वर्षीही फळविक्रीतून करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह
Aapli Baatmi October 06, 2020

पुसद (जि. यवतमाळ): कोरोना काळात छोट्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट आले. परंतु, कष्टाळू लोकांनी ते आव्हान लीलया पेलले. पुसदजवळच्या भीम नगरातील वामन मारुती कांबळे या ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने शहरभर सायकलवर फिरून फळविक्री केली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कष्टाला जिद्दीची जोड मिळाली तर काहीही करू शकतो, असे सांगत त्यांनी तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
निरक्षर वामन यांचे मूळगाव चिकणी. जवळपास तीस वर्ष त्यांनी मोलमजुरी केली. पाच पोती ज्वारी व दोन हजार रुपये एवढी त्यांची वर्षाची मिळकत. परवडत नसल्याने नंतर त्यांनी भाजीपाला व फळ विक्रीतून उपजीविकेचा मार्ग निवडला व ते पुसदला आले. सुरुवातीला कुडाच्या घरात दिवस काढले. पत्नी सुभद्रा यांनी भाजीपाला विक्रीला हातभार लावला. तीस वर्षांपूर्वी वामन यांनी एक सायकल विकत घेतली. त्यावर मोठी टोपली बांधली आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. भल्या पहाटे पाच वाजता उठून पुसदच्या भाजी मंडईत पोहोचणे. शेतकऱ्यांची हर्राशीतील ताजी फळे खरेदी करणे व नंतर सायकलवर शहरातील विविध वसाहतीतून फळांची दिवसभर विक्री करणे व नंतरच जेवण, असा त्यांचा नित्यक्रम. थंडी, पाऊस असो वा रखरखते ऊन त्यांच्या फळ विक्रीच्या सायकल फेरीत कधीही खंड पडला नाही.
हेही वाचा – रब्बी पेरणी क्षेत्रात तीस हजार हेक्टरने वाढ; दोन लाख हेक्टरवर नियोजन
पपई ,पेरू, चिक्कू, सीताफळ, केळी, सफरचंद अशी मंडईतील उपलब्ध फळे ते सायकलवरून विक्री करतात. मंडईतील दर्जेदार फळे, तेही योग्य दरात घरासमोर नियमितपणे उपलब्ध होत असल्याने ग्राहक त्यांची आतुरतेने वाट पाहतात. विशेष म्हणजे कोरोना काळात रोगप्रतिकार शक्तीचे महत्व पटल्याने नागरिकांनी फळ खरेदीवर मोठा भर दिला. त्यामुळे फळविक्रीत चांगली वाढ झाल्याचे वामन सांगतात. लॉकडाऊन काळात त्यांनी सायकलवर पायडल मारत नागरिकांना फळे उपलब्ध करून दिली.
हेही वाचा – निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू…
वामन यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फळ विक्रीतून चालतो. त्यांच्या विलास नावाच्या तरुण मुलाचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने मृत्यूपूर्वी बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारी करून कुडाचे घर बदलले. वडिलांच्या संसाराच्या गाड्याला थोडाफार हातभार लावला. मुलाच्या अकाली निधनाने ते दुःखी झाले. परंतु, या संकटाला दूर सारत वामन यांनी फळांच्या टोपलीला सायकलवरून गती दिली. आता सायकलही जुनी झाली. घंटी सोडून तिचे सगळे भाग कुरकुरतात. मात्र, गात्र थकली तरी वामन यांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झालेला नाही. दररोज ते पूर्वी एवढीच मेहनत घेतात. साधारणत: एक ते दीड हजारापर्यंत फळविक्री होते. त्यातून त्यांना ४५० ते ५०० रुपयापर्यंत मिळकत पदरात पडते. पत्नी, सून सोबत तीन नातवंडे , त्यांचे शिक्षण असा कुटुंबाचा गाडा वामन यांच्या अविरत धावणाऱ्या सायकलच्या चाकांवर चालत आहे.
हेही वाचा –
कष्टातून प्रगतीची चाके उभारी घेतात, हा आदर्श वामन यांनी युवा वर्गासमोर ठेवला आहे. कष्टातून यश तर मिळतेच, शिवाय प्रकृती ठणठणीत राहते. सायकलवरून विक्रीसाठी फिरल्याने अंगकाठी काटक बनली. कधीही दवाखान्याची पायरी चढण्याची त्यांना गरज भासली नाही. कोरोना विषाणूंना त्यांनी दाद दिली नाही. वामन म्हणतात- ” असू द्या कोरोना… नको रोना… ताजी फळे खा ना …”
संपादन – भाग्यश्री राऊत
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023