Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
लाभांश, रिबेटला कोरोनाचा फटका, वार्षिक सभा नसल्याने वाटप थांबले
Aapli Baatmi October 06, 2020

नवेखेड (जि . सांगली ) : कोरोना महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे. जिल्ह्यात मजबूत असलेले सहकार क्षेत्रही यातून सुटले नाही. जिल्ह्यात तीन हजारांहून सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा यामुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे नफा विभागणी व लाभांश वाटपही थांबले आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणाचा सहकार केंद्रबिंदू. लोकांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकारी संस्थांमध्ये शंभरी पूर्ण केलेल्या अनेक सेवा सोसायट्यांचा समावेश आहे. 31 मार्चला संस्थांचे आर्थिक वर्ष संपते. त्यानंतर लेखापरीक्षण व ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संस्थांच्या वार्षिक सभा होतात. अनेक संस्थांच्या सभा वादळी होतात, गाजतात. यात सभासदांच्या कळीचा मुद्दा म्हणजे नफा विभागणी. संस्थेला झालेल्या नफ्याची विविध प्रकारच्या तरतुदी करून नफा वाटणी केली जाते. या नफा वाटणीला कायद्याप्रमाणे सर्व साधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. प्रत्येक सभासदाच्या शेअर्सप्रमाणे 5 पासून 12 ते 15 टक्क्यांपर्यंत शेअर्सनुसार सभासदांना लाभांश वाटप केले जाते. साधारणपणे दसरा दिवाळी या सणाचे औचित्य साधून या लाभांशचे वाटप होते. सणासुदीच्या काळात अनेकांना लाभांश आधार ठरतो.
कोरोना स्थिती व नियमात अडकल्याने सहकार क्षेत्र अडचणीत आले. वार्षिक सभा झाल्या नाहीत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी लोकांना एकत्र करू नये, असा आदेश असल्याने सर्व ठप्प आहे. यावर मार्ग काढून लाभांश वाटप व्हावे, अशी मागणी सहकारी संस्थांच्या सभासदांमधून होत आहे.
दृष्टिक्षेपात सहकारी क्षेत्र
- मध्यवर्ती बॅंक 1
- विकास सोसायट्या 767
- प्राथमिक बिगर शेती पतपुरवठा संस्था 1131
- पणन संस्था 45
- प्रक्रिया उत्पादक (साखर कारखाने व इतर) 421
- दूध संस्था 572
- कोट
सध्या तरी पर्याय नाही
कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा घेऊ नयेत, असे आदेश आहेत. त्यामुळे सभांना परवानगी नाही. सध्या तरी कोणताही पर्याय निघालेला नाही.
– निळकंठ करे, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सांगली
नफा विभागणीला परवानगी द्यावी
सदस्यांच्या मासिक सभेत नफा विभागणीला परवानगी द्यावी. त्याचे निकष मात्र सहकार विभागाने तयार करून द्यावेत.
– जयकर चव्हाण, अध्यक्ष, नवेखेड सर्व सेवा सोसायटी
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023