Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
डेक्कन कॉलेजकडे 'मॉडल' विद्यापीठ म्हणून पहावे : डॉ. भूषण पटवर्धन
Aapli Baatmi October 06, 2020

पुणे – ‘डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ हे देशातील जून्या विद्यापीठातील एक असून या संस्थेत भारतीय प्राचीन इतिहास आणि भारतीय प्राचीन ज्ञानावर आधारीत अभ्यास केला जात आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात या ज्ञानाला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान देणारे ‘मॉडल’ विद्यापीठ म्हणून डेक्कन कॉलेजकडे पहायला हवे.”, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, संस्कृत अशा विषयांमधील संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय पातळी लौकिक मिळवलेले डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने मंगळवारी २०० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. पटवर्धन बोलत होते. यावेळी ऑनलाइनद्वारे झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. ए. पी. जामखेडकर, विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, डॉ. पी.डी. साबळे, डॉ. तृप्ती मोरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी; कोणी केली मागणी?
डॉ. पटवर्धन म्हणाले,”या अभिमत विद्यापीठाने आपल्या ज्ञानशाखा अधिकाधिक विस्तारल्या पाहिजेत. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, युवा संशोधक यांनी पुढाकार घ्यायला हवा. ह्यूमॅनिटीज विषयावर संशोधन होण्याची गरज असताना, त्यावर फारसे संशोधन होताना दिसत नाही. या विद्यापीठाने त्यावर गांभिर्याने संशोधन करण्यासाठी पावले उचवावीत.’
दुखणं अंगावर काढणं पडलं महागात; वडगाव येथील एकाचा मृत्यू
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला विशेष विद्यापीठाचा दर्जा द्यावा’, अशी मागणी डॉ. देगलूरकर यांनी आपल्या भाषणातून केली. तसेच त्यांनी विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. जामखेडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे ‘द्वि शताब्दी’ वर्ष साजरे करताना वर्षभर प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयांवर व्याख्याने, संशोधकांच्या लघुग्रंथमालेचे प्रकाशन, विविध कार्यशाळा असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, असे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023