Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सणासुदीच्या काळात अतिक्रमण निर्मूलन नको : व्यापारी, विक्रेत्यांची उपायुक्तांच्या बैठकीत मागणी
Aapli Baatmi October 06, 2020

सांगली- दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन केले जाईल आणि रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. मात्र, सणासुदीच्या काळात अतिक्रमण निर्मूलन राबवू नये, अशी मागणी व्यापारी, विक्रेते यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली.
महापालिकेने येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे रस्त्यावर बेकायदेशीर उभारलेले फलक, शेड काढणे सुरू केले. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. आज शिवसेना नेते शेखर माने आणि उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, विक्रेते यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांची भेट घेतली.
श्री. माने म्हणाले, “गेल्या वर्षी महापूर, यंदा कोरोना या संकटामुळे व्यापारी, विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन महिने लॉकडाउनमध्ये बंद केलेले उद्योग, व्यवसाय अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. कामगारांचे पगार, कर्जाचे हफ्तेही भागवणे अवघड झालेय. सध्या अनलॉकमध्ये हळूहळू व्यवसाय सुरु होत आहे. दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नव्याने सुरुवात करत असताना त्यांचे साहित्य जप्त करणे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे हे त्यांच्यावर नुकसानीची कुऱ्हाड कोसळण्यासारखे आहे. त्यामुळे कारवाईस स्थगिती द्यावी.
ते म्हणाले, “व्यापाऱ्यांना त्रास होईल अशी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. मात्र व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे. महापालिकेस सहकार्य करावे. महापालिका क्षेत्रात दिवाळीनंतर कारवाईबाबत आयुक्तांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.’
माजी नगरसेवक शिवराज बोळाज, रेडिमेड कापड व्यापारी असोसिएशनचे श्याम सुंदर पारेख, भाजी मंडई असोसिएशनचे मुसा सय्यद, पांडुरंग व्हनमाने, मेन रोड असोसिएशनचे सागर शेटे, भास्कर विभुते, शैलेश विभुते, रफिक शेख, रमजान महात, लाला बागवान, शोएब बागवान आदी व्यापारी व विक्रेते उपस्थित होते.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023