Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
दोन दिवसात ६० हजार परीक्षार्थींनी दिली मुक्त विद्यापीठाची परीक्षा
Aapli Baatmi October 07, 2020

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांन ऑनलाईन पद्धतीने सुरवात झाली आहे. काल (ता.५) पासून परीक्षांना सुरवात झाली असून, दोन दिवसांत साठ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. परीक्षेला ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भोंडे म्हणाले, की विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि सुटसुटीत ऑनलाईन परीक्षा प्रणाली तयार केल्यामुळे पहिल्याच दिवशी राज्यभरातून परीक्षेला सरासरी ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले. ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत देता यावी, अशी लवचिकता ठेवली आहे. विविध शिक्षणक्रमांकरिता ठरवून दिलेल्या दिवसाच्या प्रहरातील निर्धारित पाच तासांपैकी कोणत्याही सलग दोन तासात विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. काल (ता.४) पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रात ७७ टक्के तर, दुसऱ्या सत्रात ८७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला सामोरे गेले.
हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ
३० ऑक्टोबरपर्यंत चालणार परीक्षा
एकुण १ लाख ९० हजार ३३९ परीक्षार्थी असून येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली. दोन दिवसात ६० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ऑनलाईन परीक्षा दिली. परीक्षार्थींसाठी अभ्यासक्रमनिहाय सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते रात्री आठ असे दोन सत्र दिले असून त्यांनी या पाच तासांपैकी कोणत्याही एका तासात पेपर द्यायचा आहे. एकुण ६० गुणाच्या पेपरसाठी ५० प्रश्न दिले जात असून त्यापैकी कोणतेही ३० सोडवायचे आहेत. मोबाईल, लॅपटॉप, संगणक या पैकी कोणतेही उपकरण ऑनलाईन परीक्षेकरिता वापरता येऊ शकते. विविध विभागीय केंद्राना विद्यार्थी सहायता कक्ष सुरू केला असून, सहाय्यता क्रमांकदेखील परीक्षार्थींना दिला आहे.
हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते ‘घबाड’; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन
विद्यापीठाला एकूण १० लाख परिक्षा घ्यायच्या असून, एका वेळी ३५ हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार त्यामुळे बँड विड्थ फेल्यूअर होऊ नये म्हणून पाच तासाचा स्लॉट ठेवलेला आहे. क्लाऊड सर्वरचा वापर केलेला असून, त्यामुळे संपूर्ण राज्यभरात सुरळीत परीक्षा सुरू आहेत.
– डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023