Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पावणेअठरा लाखांचा गांजा जप्त; उमराणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Aapli Baatmi October 07, 2020

जत : उमराणी (ता. जत, जि. सांगली ) येथे मल्लाप्पा ईरगोंडा बिराजदार (वय 65) याच्या उसाच्या शेतीत लागवड केलेली 147 किलो वजनाची गांजाची झाडे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज जप्त केली आहे. त्या झाडांची सुमारे 17 लाख 76 हजार इतकी किंमत होते. अधिक तपासासाठी बिराजदार याला अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नूतन पोलिस अधीक्षक दीक्षित गेंडाम व अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबूल यांनी अवैधरीत्या गांजातस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले आहे. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज तालुक्यात गांजाची माहिती घेत असताना पोलिस नाईक मुदतसर पाथरवट यांना मल्लाप्पा बिराजदार याच्या उसाच्या शेतीत गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बिराजदार याच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्या वेळी उसाच्या शेतीत गांजाची झाडे आढळून आली. पंचांसमक्ष झाडांचा पंचनामा करीत ती जप्त करण्यात आली. बिराजदार याला अटक करून अधिक तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
“खुलेआम गांजाची लागवड’ या मथळ्याखाली जत तालुक्यातील गांजासंदर्भातील बातमी “सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. यानंतर पोलिस अधीक्षक गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक डुबूल यांनी सांगली जिल्ह्यात गांजाची लागवड करणारे व विक्री करणारे यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार उमराणी येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहायक पोलिस फौजदार अच्चुत सूर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेंद्र मुळे, आमसिद्धा खोत, राजू शिरोळकर, महादेव दुधाळ, सचिन कुंभार, श्री. पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी, अरुण सोकटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023