Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
गणपती मंदिर, शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा
Aapli Baatmi October 07, 2020

सांगली : महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला. मोठ्या संख्येने रस्त्यावरील फलक, शेड, खोकी हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने सांगलीत सर्व रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी बेकायदा उभारलेले डिजिटल फलक, शेड तसेच खोकी हटवण्याची मोहीम सुरु आहे. अतिक्रमण निर्मुलन विभागाने उपायुक्त राहूल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बाजारपेठेत कारवाई करुन रस्ते मोकळे केले आहेत. आज विश्रामबाग परिसरातील हॉटेल चिनारपासून गणपती मंदिर ते शंभर फुटी रोडपर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली.
गेल्या काही वर्षात बाजारपेठेतील रस्त्यावर व्यापारी, विक्रेत्यांनी शेड घालणे, कट्टे करणे, डिजिटल फलक उभारणे असे प्रकार केले आहेत. त्यामुळे ही जागा अडकून पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे महापालिकेने अशी बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम उघडली आहे. या कारवाईत सहायक आयुक्त एस एस खरात, सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक पंकज, श्रीकांत मद्रासी, अंजली कुदळे कोमल कुदळे, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
रस्त्यावर शोभिवंत झाडांचे गार्डन नको
सार्वजनिक रस्त्यावर शोभिवंत झाडांचे गार्डन करून रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे या मोहीमे दरम्यान समोर आले. रस्त्यावर उभारलेल्या शोभिवंत झाडांमुळे रस्त्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांनी रस्त्यावर शोभिवंत झाडे लावून गार्डन बनवून रस्ते अडविले आहेत. त्यांनी तातडीने काढून घ्यावीत अन्यथा महापालिका प्रशासनाकडून ते हटविण्यात येईल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023