Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अन् आमदार बाबासाहेब पाटील महावितरणच्या अभियंत्यावर भडकले !
Aapli Baatmi October 07, 2020

उदगीर : अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे तक्रारी मांडल्या. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी मंगळवारी (ता.६) उदगीरचे कार्यकारी अभियंता कार्यालय गाठून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. खरमरीत समाचार घेत शेतकरी बांधवांचे कामे करा असे सांगीतले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मतदारसंघातील व महावितरण विभागातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या अडचणीची कैफियत सांगितली. अनेक तक्रारी दिल्या आमदारांनी उदगीरच्या महावितरण कार्यालयात जाऊन पंचनामा केला व जाब विचारला. यामुळे वेळेवर ट्रांसफार्मर मिळत नाही, ट्रांसफार्मर देत असताना शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळत नाही, शेतकरी अनेक वेळा येऊन कार्यालयात चकरा मारतात, कार्यालयीन कर्मचारी चांगल्या पद्धतीने समजावून सांगत नाहीत. किंवा वागणूक चांगली देत नाहीत, तसेच ट्रांसफार्मर देत असताना भेदभावाची वागणूक करतात, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार पाटील यांनी स्वतः उदगीरला येऊन महावितरणचे कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्यकारी अभियंता श्रवण कुमार व ट्रांसफार्मर वितरणचे अभियंता श्री पोतदार यांना त्यांच्या कार्यालयातील रजिस्टर व वितरण करण्याची पद्धत व शेतकऱ्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारी यांचा ताळमेळ लावून रितसर रजिस्टर प्रमाणे तपासणी करून त्यांना खडे बोल सुनावले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच अहमदपूर व चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवून घेतले. यापुढे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल नाही घेतल्यास, शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्यास, गावकऱ्यांना त्रासदायक वागणूक दिल्यास, तसेच वेळेवर ट्रांसफार्मर नाही दिल्यास, रीतसर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू अशी तंबी दिली. रजिस्टर मध्ये असलेल्या चुका यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत असे ही सांगितले. ट्रान्सफार्मर देते वेळेस जाणून बुजून काही लोकांना टाळणे निदर्शनास आल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महावितरणचे कार्यकारी अभियंता श्रावण कुमार यांनी आमदार पाटील यांना यापुढे अशी चूक होणार नाही व यापुढे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना रीतसर सिरीयल नंबर प्रमाणे व जेथे आवश्यकता असल्यास लागल्यास ट्रांसफार्मर उपलब्ध करून देऊ. जनतेची गैरसोय होऊ देणार नाही असे आश्वासन ट्रांसफार्मर वितरण विभागाच्या पोतदार या अभियंत्यास यापुढे चांगले वागण्याची तंबी आमदारांनी दिली. सोबत शेळगाव येथील शेतकरी गणेश पाटील स्वीय सहाय्यक धनंजय जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023