Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
Sakal Impact : आमदार पवारांनी महामार्गाच्या निकृष्ट कामाची गडकरींकडे केली तक्रार !
Aapli Baatmi October 07, 2020

औसा (लातूर) : “केंद्रीय मंत्री गडकरी यांचा दावा ठरला खोटा” या मथळ्याखाली ‘सकाळ’ ने २९ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातुन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. त्याची गंभीर औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घेत राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर पडलेल्या भेगा आणि अन्य कामाची पाहणी मंगळवार (ता.६) केली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जाग्यावरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून या रस्त्याची संबंधित कंत्राटदार यांनी केलेल्या दुर्दशेची माहिती दिली. तसेच गडकरी यांना एक पत्र लिहून या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
औसा तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी ते वारंगा फाटा ३६१ आणि तुळजापूर मोड ते उमरगा जाणाऱ्या ५४८ (ब) या दोन्ही महामार्गाचे काम नुकतेच झाले आहे. ५४८ (ब) मार्गाचे काम अद्यापी सुरू असले तरी ३६१ चे काम होऊन वर्ष झाले. औसा ते उजनी या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी बाहेर पडण्याची कुठलीच व्यवस्था दिलीप बिडकॉन या कंपनीने केली. नेहमी या भागात अपघात घडत आहेत. याबाबत अनेक तक्रारीही आमदारांकडे आल्या. करोडो रुपये टोलच्या माध्यमातून लाटणाऱ्या कंत्राटदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मंगळवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी तडक औसा ते आशिव टोलनाक्या पर्यंतचा परिसर तपासला असता त्यांना रस्त्याला भेगा, चढ उतार, पावसाचे पाणी रोडवरून वाहून जाण्यासाठीची व्यवस्था नसल्याचे आणि टोलनाक्यावरील दोन्ही बाजूला असलेली लाईट बंद असल्याचे दिसून आले. या सर्वांचे फोटो काढून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आणि एक पत्र लिहून याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
औसा-आशिव मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाला तडे गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. प्रत्यक्षात पाहिल्यावर तक्रारीत तथ्य दिसल्याने मी मंत्री नितीन गडकरींना फोनवर बोललो. एक पत्र लिहून याला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली.
– आमदार अभिमन्यू पवार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023