Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
माणुसकी हाच खरा धर्म! सौदी अरेबियातील जेद्दाहात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका
Aapli Baatmi October 07, 2020

नाशिक : ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा’ मित्र या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे. मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली.
मायदेशी परतण्यासाठी कामगार व्याकूळ
मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. सौदी अरेबियामध्ये जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले हे भारतीय कामगार कोरोना व लॉकडाउनमुळे तेथेच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, काहींनी नोकऱ्या गमावल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करून गुजराण करत होते, तर काही जण निर्धन झाल्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्याने अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली होती. तुरुंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकूळ झाले होते.
हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते ‘घबाड’; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन
मसालाकिंग यांच्यातर्फे भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची
याबाबतचे प्रसारमाध्यमांत आले होते. डॉ. धनंजय दातार यांना हे समजताच ते अस्वस्थ झाले. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत (कॉन्सुलेट) जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरुंगवासातून सोडल्यास सर्वांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखविली. सौदी अरेबिया प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. यातील ४५१ कामगार सौदिया एअरलाइन्स च्या दोन विशेष फ्लाइट्समधून दिल्ली विमानतळावर, तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा > …म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा
संपादन – ज्योती देवरे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023