Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सांगली जिल्ह्यात 583 जण कोरोनामुक्त; नवे 358 रुग्ण; 20 जणांचा मृत्यू
Aapli Baatmi October 07, 2020

सांगली : जिल्ह्यात आज 358 जणांना कोरोनाची बाधा झाली; तर दिवसभरात 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बाधितांची संख्या 39 हजार 518 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यातील 17, तर परजिल्ह्यांतील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या एक हजार 460 झाली आहे.
आज 840 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या. त्यात 104 बाधित आढळले. 2020 अँटिजेन तपासण्यांत 257 बाधित आढळले. आटपाडी तालुक्यात 27, जत 26, कडेगाव 51, कवठेमहांकाळ 10, खानापूर 24, मिरज 27, पलूस 23, शिराळा 11, तासगाव 4, वाळवा 74, तर महापालिका क्षेत्रात 81 बाधित आढळले.
कडेगाव तालुक्यातील एक, खानापूर तीन, मिरज दोन, पलूस एक, तासगाव एक, वाळवा तीन, कवठेमहांकाळ दोन आणि महापालिका क्षेत्रातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय, परजिल्ह्यांतील तिघांचा आज मृत्यू झाला.
सध्या 654 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर 84, हायफ्लो ऑक्सिजनवर 41, तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर सहा जण उपचार घेत आहेत. या स्थितीत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 39 हजार 518 वर पोचली आहे. परजिल्ह्यांतील आज तीन नवे बाधित आढळले आहेत. सध्या 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील चित्र
- आजचे बाधित ः 358
- उपचारांखाली ः 5,514
- बरे झालेले ः 32,544
- एकूण मृत्यू ः 1,460
- एकूण बाधित ः 39,518
- चिंताजनक ः 785
- ग्रामीण बाधित ः 18,466
- शहरी बाधित ः 5,894
- मनपा क्षेत्र ः 15,158
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023