Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
दहावी नापास विद्यार्थ्यांना मिळणार पूर्ण प्रवेश
Aapli Baatmi October 07, 2020

बेळगाव : दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे नापास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळते.
हेही वाचा – बेळगावातील मंगलकार्यालये होणार सुरू
मात्र परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात पुर्ण प्रवेश दिला जात नव्हता. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षांपासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीत पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक दोन विषय शिल्लक राहिले तरी विद्यार्थ्यांना दहावीत पूर्ण प्रवेश घेताना सर्व विषय घेऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी दहावीची पुरवणी परीक्षा देतात. मात्र पुरवणी परीक्षेनंतर ज्यादातर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात. त्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त एकच वर्षासाठी दहावीत प्रवेश मिळणार आहे. पुन्हा प्रवेश घेऊन नापास झाल्यास त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीत प्रवेश दिला जाणार नाही असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार दरवर्षी 1 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नापास होतात मात्र शाळेपासून दूर असल्याने पुरवणी परीक्षा देऊन देखील नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, मात्र नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण प्रवेश दिल्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – म्हादईप्रकरणी लढा तीव्र ; कर्नाटकविरोधात गोवा सरकारची अवमान याचिका
“नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून दूर जात असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करून दहावीत पूर्णप्रवेश दिला जाणार आहे. नवीन नियमाबाबत लवकरच शाळांना माहिती दिली जाणार आहे त्यानुसार नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.”
– अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023