Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नांदेड - २६३ रुग्ण कोरोनामुक्त, सात बाधितांचा मृत्यू , दिवसभरात २०९ पॉझिटिव्ह; ७७३ अहवालांची प्रतिक्षा
Aapli Baatmi October 07, 2020

नांदेड – जिल्ह्यात उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या संख्येत घट झाली आहे. बुधवारी (ता. सात) प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागास एक हजार २७७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार २८ निगेटिव्ह तर २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला तर २६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मंगळवारी (ता. सहा) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी एक हजार २७७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. त्यापैकी २०९ जणांना कोरोनाची बाधा झाली. आत्तापर्यंत १६ हजार ८४१ रुग्णांची नोंद झाली आहे. अशोकनगर नांदेड पुरुष (वय ८५), गजानन मंदीर परिसर नांदेड महिला (वय ६२), श्रीनगर नांदेड पुरुष (वय ६५), वाईबाजार पुरुष (वय ६५), शारदानगर देगलूर पुरुष (वय ६२), अर्धापूर पुरुष (वय ७२), वडगाव (ता. हदगाव) पुरुष (वय ७०) असे सहा पुरुष आणि एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृताची संख्या ४४६ वर जाऊन पोहचली आहे.
हेही वाचा- नियमाला मिळाली शिथिलता ‘अन्’ कार्यालये ‘लॉक’
आतापर्यंत १३ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त
दहा दिवसाच्या उपचारानंतर बुधवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील १२, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय १३, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम क्वॉरंनटाईनमधील १६१, बिलोली चार, लोहा सहा, हदगाव सहा, माहूर एक, मुखेड सात, धर्माबाद सहा, किनवट १३, नायगाव आठ, लातूर दोन, निजामाबाद एक, औरंगाबाद दोन आणि खासगी रुग्णालयातील २१ असे २६३ कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १३ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचले पाहिजे- वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले
७७३ अहवाल येणे बाकी
बुधवारच्या अहवालात नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत १११, नांदेड ग्रामीण सहा, भोकर एक, लोहा ११, हदगाव दोन, धर्माबाद तीन, कंधार आठ, माहूर एक, उमरी सात, अर्धापूर पाच, मुखेड २०, नायगाव सात, हिमायतनगर एक, किनवट १५, देगलूर एक, बिलोली तीन, हिंगोली चार, परभणी एक, मुंबई दोन असे २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १६ हजार ८४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी १३ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दोन हजार ८१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ७७३ अहवाल येणे बाकी आहे.
नांदेड कोरोना मीटर
आत्तापर्यंत कोरोनाबाधित – १६ हजार ८४१
आज कोरोना पॉझिटिव्ह – २०९
आतापर्यंत कोरोना मुक्त – १३ हजार ४७६
आज कोरोनामुक्त – २६३
आतापर्यंत मृत्यू – ४४६
आज मृत्यू – सात
उपचार सुरु – दोन हजार ८१८
गंभीर रुग्ण – ४६
अहवाल प्रलंबित – ७७३
—–
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023