Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
खंडणीप्रकरणी महिलेसह कोडोलीच्या दोघांवर गुन्हा
Aapli Baatmi October 07, 2020

सातारा : महिलेशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत बेकरीमध्ये काम करणाऱ्या एकाकडून 70 हजार रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर मंगळवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. जयश्री दिलीप यादव व आनंद शिंदे (दोघेही रा. अहिरे कॉलनी, कोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गोडोली येथील साई मंदिर परिसरात महेश हणमंत धनावडे हे राहण्यास आहेत. धनावडे हे एका बेकरीत कामास असून कामादरम्यान त्यांची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे नंतरच्या काळात घनिष्ठ संबंधांत रुपांतर झाले. त्याची माहिती जयश्री यादव व आनंद शिंदे यांना मिळाली. त्या दोघांनी महेश धनावडे व त्यांच्या मैत्रिणीच्या घनिष्ठ संबंधांचे मोबाईलवर शुटींग केले. हे शुटींग व्हायरल करण्याची धमकी दोघांनी धनावडे यांना फोनवरुन देण्यास सुरुवात केली.
साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी गडचिरोलीचे अजयकुमार बन्सल
16 जून 2019 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत वारंवार फोन करत त्या दोघांनी धनावडे यांच्याकडून 70 हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या दोघांनी धनावडेकडे चार लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे न दिल्यास घनिष्ठ संबंधांची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी त्या दोघांनी धनावडे यांना दिली. वारंवारच्या धमक्यांना वैतागून धनावडेंनी बुधवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार जयश्री यादव, आनंद शिंदे या दोघांवर खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. हवालदार गुलाब जाधव हे तपास करीत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges filed Against Both Of Kodoli Satara News
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023