Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
उस्मानाबाद : आज ३६३ जण झाले बरे, ९० बाधितांची भर !
Aapli Baatmi October 07, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.०७) दिवसभरात ३६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर नवीन ९० रुग्णांची भर पडली आहे. दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० हजार ७०१ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.२८ टक्के इतके वाढले आहे. त्याचवेळी मृत्युचा दर अजूनही तीन टक्क्याच्यावर असल्याने निश्चितपणाने तो चिंतेचा विषय आहे. हा दर कमी करण्याचे प्रशासनासमोर मोठ आवाहन उभे राहिले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
सध्या जिल्ह्यामध्ये ६७४९ व्यक्ती होम क्वारटाईन आहेत. १०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईमध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये ७४ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ४५९ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ३८५ जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. १५४ जणाचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तर इतर जिल्ह्यामध्ये आठ जण बाधित झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यामध्ये २९ जणांना कोरोनाची लागन झाली आहे, त्यातही २३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर एक जण आरटीपीसी आरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. इतर जिल्ह्यामध्ये पाच जणांना लागन झाल्याचे समोर आले आहे. उमरगा येथे दहा जणांना लागन झाली आहे, वाशीमध्ये १६ व कळंब १३ जणांना बाधा झाल्याचे दिसुन येत आहे. इतर तालुक्यामध्ये एकेरी आकड्यात रुग्णाची संख्या आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दोघांचा मृत्यू
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ७५ वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील ७० वर्षीय उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे मृत्यु झाला आहे.
उस्मानाबाद कोरोना मीटर
- एकुण रुग्णसंख्या- १३००६
- बरे झालेले रुग्ण – १०७०१
- उपचाराखालील रुग्ण- १८९४
- एकुण मृत्यु – ४११
- आजचे बाधित – ९०
- आजचे मृत्यु – ०२
(Edited By Pratap Awachar)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023