Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
वाघांच्या स्थानांतरासाठी अभ्यासगट, काय सांगतात वनमंत्री
Aapli Baatmi October 07, 2020

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे सुयोग्य अधिवासात संवर्धन व स्थानांतराबाबत विविध पर्याय तपासणे व उपाययोजना सुचवणे यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने मानव व वाघ संघर्ष यात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या संवर्धन, स्थानांतराबाबतचा विषय चर्चेला आला.
याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट नेमण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मुख्य वन संरक्षक चंद्रपूर एन.आर. प्रवीण यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय अभ्यास गट स्थापन केली आहे. अभ्यास गट ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपला अहवाल शासनास सादर करणार आहे. वाघांची नसबंदीचा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम सकाळने प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्याच बैठकीत वाघांच्या स्थलांतरासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. हे विशेष.
भाजीपाल्यासोबतच आता उपवासही महागला, गृहिणींसमोर नवे संकट
उपवनसंरक्षक कुलराज सिंग (गोंदिया) हे या अभ्यास गटाचे सदस्य सचिव असतील. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव- व्याघ्र संघर्षाच्या घटना समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे, मानव – व्याघ्र संघर्षाबाबत स्थानिकांची मते जाणून घेणे,मानव- व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या कार्यवाहीचे विश्लेषण करणे, मानव- व्याघ्र संघर्ष कमी होण्यासाठी उपाययोजना सुचविणे याबाबत अभ्यास गट काम करणार आहे. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करेल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
अभ्यासगट
एन.आर. प्रविण (अध्यक्ष, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर), कुलराज सिंग (सदस्य सचिव, उपवनसंरक्षक ,गोंदिया) डॉ. जितेंद्र रामगावकर (उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर ),डॉ. बिलाल हबीब (शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून), संजय ठावरे (सेवानिवृत्त उपवनसंरक्षक), गिरीश वशिष्ठ (सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी), डॉ. विद्या अत्रेय (वनसंवर्धन अभ्यासक), डॉ. अनिश अंधेरिया (अध्यक्ष, वन्यजीव संवर्धन संस्था) संजय करकरे ( अभ्यासक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी), बंडू धोत्रे (सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ), परोमिता गोस्वामी (संस्थापक, एल्गार प्रतिष्ठान).
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023