Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
राष्ट्रवादी नेते प्रकाश गजभिये यांनी केलं हाथरस पीडितेच्या कुटूंबियांचे सांत्वन
Aapli Baatmi October 07, 2020

मुंबई, ता. 07 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेतील सर्व दोषींवर कडक कारवाईची मागणी ही त्यांनी यावेळी केली.
हाथरस हत्याकांडातील आरोपींचे घर मनिषाच्या घराजवळच आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटूंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पोलिस सुरक्षेची मागणी प्रकाश गजभिये यांनी यावेळी केली.
महत्त्वाची बातमी : रियाच्या जामीन प्रकरणात न्यायालयाचे NCBला खडेबोल, कायद्यापुढे सर्वजण सारखेच असतात
पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. गावात फ़क्त चारच घरे दलितांची असल्याने कुटुंबात असुरक्षिततेची भावना आहे. त्यातच गावात खूपच तणाव आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना घराबाहेर पडणे अवघड आणि जोखमीचे आहे. म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी ही गजभिये यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महत्त्वाची बातमी : तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन
प्रकाश गजभिये यांनी हाथरस येथील चांडप्पा पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस निरीक्षक लक्ष्मण सिंग यांना निवेदन सादर केले आणि पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी गजभिये यांना पोलिसांनी अडवल्याने गजभिये यानी निषेध केला आहे.
( संपादन – सुमित बागुल )
NCP leader prakash gajbhiye met family of hathras nirbhaya
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023