Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सोयाबीन खरेदीत शेतकऱ्याची लूट
Aapli Baatmi October 08, 2020

नवेखेड : सोयाबीन खरेदीचा शासनाचा हमीभाव ३८८० रुपये आहे. परंतु शेतकऱ्यांना मिळतात ३००० ते ३२०० रूपये. शासनाचे जिल्ह्यात एकही हमीभाव केंद्र नाही. खासगी व्यापारी सोयाबीन खरेदी केंद्रांमधून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्याने नियंत्रण ठेवावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सोयाबीन हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी बरोबरच ऊस पट्ट्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एकरी १२ क्विंटल पासून १८ ते २० क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे पट्टीचे शेतकरी जिल्ह्यात आहेत. शासनाने यावर्षी ३८८० रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीन खरेदीचा दर जाहीर केला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांनी नाफेडकडे जिल्ह्यातील बाजार समितींना हमीभाव खरेदी केंद्रे मिळावीत यासाठी मागणी मागणी केली होती. परंतु, त्यांना ती आज अखेर मिळालेली नाही. शेतकऱ्यांची नोंदणी करून अशा सूचना आहेत. परंतु, कोणतीही वेबसाईट अन्य काही माहिती नाही. खासगी व्यापाऱ्यांनी मात्र या संधीत आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. आद्रतेचेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. अठरा मोएशरला जवळपास बारा कोलोची तूट धरली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे तीन मोठे कारखाने आहेत. हे कारखाने व्यापाऱ्यांशी संधान बांधून इतक्या दरापर्यंत तुमचा माल घेतो अशी हमी देतात. त्यानुसार व्यापारी मधल्या मार्जिनवर शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करतात. सोयाबीन मधील मोएशर, माती, डागी असे करून प्रति क्विंटल १२ ते १४ किलोपर्यंत तूट धरली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात ३००० ते ३२०० इतकीच रक्कम मिळते. काही शेतकऱ्यांना अपवादात्मक स्थितीत मोएशर कमीलागले तर १०० ते दोनशे रुपये जादा मिळतात. काही ठिकाणी सदोष वजन काटे आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत आहे. सोयाबीन हंगाम आधी त्या काट्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. वास्तविक हमीभाव जाहीर झाला. परंतु, केंद्रे सुरू झाली नाहीत. प्रभोधनाच्या पातळीवर शासकीय यंत्रणा कमी पडली. बाजार समित्यांचे हात कायद्याने बांधले असल्याने या बाजार समिती कारखान्याकडून दंड आकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक ३८८०रुपयेचा बेस धरून खासगी व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांच्या मधून होत आहे. माती, डागी याला शेतकऱ्यांचा विरोध नाही.
सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्र मिळावीत म्हणून नाफेड कडेअर्ज केले आहेत. परंतु अद्यापही त्याची परवानगी मिळालेली नाही.
–विजय कुमार जाधव, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूर.
हे पण वाचा – डोक्यात दगड घालून वडिलांनीच केला मुलाचा खून
३८८० रुपये बेस धरून खासगी व्यापार्यांनी सोयाबीन खरेदी करावे, अन्यथा त्यांचा विक्री परवाना रद्द करावा, वजन काट्यांची तपासणी व्हावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहील.
–भागवत जाधव, अध्यक्ष वाळवा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023