Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
घरगुती वादातून पतीचा मृत्यू, हिंगोलीतील घटना
Aapli Baatmi October 08, 2020

हिंगोली : शहरातील इंदिरानगर भागात सोमवारी (ता.सहा) घरगुती वादातून पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, मात्र मंगळवारी उशिराने शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली.
शहरातील इंदिरानगर भागात शेख शब्बीर व त्यांचे कुटुंब राहते. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउन काळात हाताला काम न मिळाल्याने घरगाडा कसा चालवावा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर पडल्याने ते तणावाखाली होते. यातच पत्नीने घर चालविण्यासाठी रेटा लावला होता. अनेक वेळा घरगुती वाद देखील झाले होते.
हेही वाचा – नांदेड : गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी
पत्नीकडील मंडळींनी भरदिवसा मारहाण केली
अनेक वेळा पत्नीने जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्याचे शब्बीर यांच्या आईने सांगितले. मात्र, शब्बीर याने मनावर न घेता लॉकडाउन शिथिल झाल्याने कामही करू लागले. परंतू, पुन्हा हा वाद विकोपाला गेल्याने सोमवारी शेख शब्बीर घरात असताना पत्नीकडील मंडळींनी भरदिवसा मारहाण केली. यात शेख शब्बीर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
येथे क्लिक करा – हिंगोलीत भाजपने जाळल्या शेती विधेयकाला स्थगिती देणाऱ्या प्रति
दोन महिला व दोन पुरूषांना घेतले ताब्यात
सदर प्रकरणात मयताच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करून गुन्हा दाखल करावा, घातपात करणाऱ्या व्यक्तींना फाशी देण्याची मागणी केली आहे. शेख शब्बीर याच्या आईने पोलिस ठाणे गाठून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली असता पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात सदर व्यक्तीचा घातपात केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप शहरातील मयताच्या नातेवाईकांनी केला.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट
त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी यतिष देशमुख, पोलिस निरीक्षक सय्यद, पोलिस उपनिरीक्षक नितीन केनेकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, त्यानंतरच गुन्हा नोंदविला जाईल असे सांगितले. सदर प्रकरणात मयत शेख शब्बीर याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून काही जणांवर संशयही घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन महिला व दोन पुरूषांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
संपादन ः राजन मंगरुळकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023