Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
शोध अंतरमनाचा
Aapli Baatmi October 08, 2020

आपल्या पालकांच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेक युवक इच्छा नसतानाही करियरची अशी दिशा निवडतात की, त्या दिशेतून ते आपल्या जीवनाचा मार्ग भरकटत जातात. त्यामध्ये त्यांचे मन रमत नाही, स्पर्धेत ते मागे पडत जातात. अपयश, निराशा त्यांच्या पदरी पडत जाते. मग अचानक त्यांना आपल्या अंतरमनाचा साक्षात्कार होतो. निवडलेले क्षेत्र आपले नाहीच, या क्षेत्राचा आपण गांभिर्याने विचार केलेला नव्हता. पण, केवळ आई-वडील यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न आणि मित्र परिवार, नातेवाईक काय म्हणतील या भीतीने त्यांनी ते क्षेत्र निवडलेले असते.
हातातून वाळू सरावी, तसे उमेदीचे वय सरत असते, दिवसांमागून दिवस निघतात आणि अशा परिस्थितील पुन्हा नव्याने मार्ग चोखाळणे सर्वानाच शक्य होत नाही. असे क्वचितच सापडतात जे या महादिव्यातून परत आपल्या आवडीचा मार्ग शोधून नव्या जीवनाची सुरुवात करतात. यातीलच एक नाव म्हणजे गणपतीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण शहरातील शिवराज म्हात्रे हा तरुण.कॉम्प्युटर इंजिनियरींचे क्षेत्र सोडून या अवलियाने साहित्यिक होण्याचा मार्ग निवडला आणि त्यात तो यशस्वी देखील होत आहे. त्याची अॅमेझॉनवर तीन पुस्तके प्रकाशित झालेली झालेली आहेत.
जगभरातून या पुस्तकांसाठी मागणी वाढत आहे. अॅमेझॉनवरील एक प्रथितयश साहित्यिक म्हणून त्याची ओळख वाढत आहे. पण, ही कवचकुंडले झिडकारुन जीवनाचा नवा मार्ग निवडणे तितकेसे सोपे काम नव्हते. आपल्या मनात जे आहे, ते कोऱ्या कागदावर उतवत असताना 200 पानांची 20 रजिस्टर्स केव्हा भरुन काढली हे त्यालाच समजले नाही. तयार झालेल्या लिखाणाचे करायचे काय, तर त्याने त्याचे पहिले “फिलॉसॉफी” या अवघड विषयावर पुस्तक तयार केले. शेअरमार्केटमध्ये त्याला गोडी होती, त्या विषयावरही त्याने भरपूर प्रमाणात लिखाण केले. मराठी तरुण सहसा शेअरमार्केटमध्ये उतरत नाही.
जे तरुण शेअरमार्केटमध्ये उतरण्याचे धाडस दाखवतात, त्यांच्यासाठी मराठीतून पुस्तके नाहीत. अशा तरुणांसाठी शिवराज म्हात्रेने लिहीलेले हे पुस्तक दिशादर्शकाचे काम करीत आहे. आपल्याला लिखाण जमत आहे आणि ते इतरांना आवडत असल्याचे समजल्यानंतर शिवराजची लिखाणातील आवड वाढत गेली. अॅमेझॉनच्या किंन्डल अॅपवर त्याची ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्याने “रेड अलर्ट” ही हिंदीतून एक कादंबरी प्रकाशीत केली आहे. या सर्व पुस्तकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने शिवराजचा विविध विषयांवर लिखाण करण्याचा उत्साह वाढला आहे. यातून गमावलेला जीवनाचा मार्ग नव्याने गवसल्याचे समाधान व नव्याने काहीतरी चांगले करण्याचा आत्मविश्वास मिळत असल्याचे शिवराजचे म्हणणे आहे. अॅमेझॉनवरील त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून,ऑनलाईन पद्धतीचा योग्य वापर करुन शिवराज साहित्यिक विश्वात चमकु पहात आहे. सोशल मिडीयावर त्याचे फॉलोअर्स देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. यापुर्वी जे मित्र,नातेवाईक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते ते देखील त्याच्या कर्तृत्वाने प्रभावीत होत आहेत.
आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या अनेक चढउतारांच्या अनुभवाने शिवराज मानसिकदृष्ट्या खचून न जाता अधिकच सक्षम झाला आहे. मार्ग भरकटणाऱ्या तरुणांना सांगताना तो बोलतो ”अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानणारे अपयशाने कधीच खचून जात नाहीत, ते परिश्रम, मेहनत आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी अधिकच सक्षम होतात. कोणीही आपल्याला फुकटचे मार्गदर्शन करीत नाही, अनेकवेळा लोक हातचे राखूनच आपल्याला मार्गदर्शन करीत असतात; परंतु अनुभवातून खूप काही शिकता येते.”
लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शिवराजने कॉम्प्युटर इंजिनीयर होण्यासाठी उमेदीची सहा वर्ष खर्ची घातली होती. परंतु हे आपले क्षेत्रच नसल्याचे त्याला सतत वाटत असे. दहावी, बारावीला चांगले गुण मिळवल्याने घरच्यांच्याही आशा आकांक्षा वाढल्या होत्या. शिवराजचे इतर मित्र डॉक्टर, वकील, इंजिनीयर होऊन संसाराला लागले होते. तरीही शिवराज मात्र अंधारात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत होता. त्याचे तांत्रिकी अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते. आपले काहीतरी चुकत असल्याची त्याला सतत जाणीव होत असे.
आपल्याला आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचा धांडोळा मांडताना अचानक त्याला जाणीव झाली की, आपण लिखाण चांगल्या प्रकारे करु शकतो. “यातून मला माझ्याच अंतरमनाचा शोध लागला, जे काही सुचत होते ते कोऱ्या कागदावर उतरवत गेलो आणि कोऱ्या आयुष्याला पुन्हा एकदा उभारी येऊ लागली” शिवराजचे विचार किती वस्तुस्थितीशी चपखल बसणारे आहेत, हे त्याची पुस्तके वाचताना लक्षात येते. त्याच्या धडपडीला लाख लाख सलाम…!
* शिवराज म्हात्रे – मो. 7030239346 * ई-मेल – shivrajmhatre1985@gmail.com
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023