Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पुन्हा परतीच्या पावसाचे जड झाले जाणे! शेतकरी बांधवांनो सांभाळा पिके
Aapli Baatmi October 08, 2020

नागपूर ग्रामीणः मॉन्सूनच्या पावसाचे येणे जसे दीर्घकाळ व्याकूळ करुन सोडणारे असते तसे परतीच्या पावसाचेही आता न निघून जाणेही छळणारेच असल्याचा प्रत्यय यंदाचा पाऊस देतो आहे. सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आणला.
आता जा-जा म्हणता न जाणारा परतीचा पाऊस फार हट्टखोर होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी चहूबाजूने कचाट्यात सापडला असताना परतीच्या पावसाचे निघून जाणे त्रासदायक ठरत आहे. बुधवारी पावसाने आपल्या जाण्याचा इशारा देऊन शेतकऱ्यांच्या मनात धडका भरविली.
जाणून घ्या – हृदयद्रावक…रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा
माल सुरक्षित जागी हलविण्याचा सल्ला
रामटेकः मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने रामटेककरांना चांगलेच झोडपले. तालुक्यात सायंकाळी ५ वाजता संततधार पावसाला सुरुवात झाली. आता कुठे शेतकऱ्यांच्या धान कापणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक कापून बांध्यात पडलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातांशी आलेल्या धान पिकाचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पावसाचा तीव्र फटका हिवरा बाजार, देवलापारसह तालुक्यातील अनेक गावातील परिसरातील शेतकऱ्यांना बसू शकतो.
शेतकऱ्यांनो, नुकसान टाळा !
उमरेड : जिल्ह्यात प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या अंदाजानुसार ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी तुरळक ते विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस त्याचबरोबर १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी तसेच इतर परिपक्व झालेल्या पिकांची काढणी आणि मळणीची कामे सुरु आहेत. कृषी विज्ञान केंद्र, भारतीय कृषी अनुसंधान केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ वासनिक, डॉ.सचिन वानखेडे, विषय विशेषज्ञ, कृषी हवामान शास्त्राचे प्रशांत गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी – दिवसा चटके, पहाटे थंडी; सोबतीला उद्यापासून वादळी पाऊसही
अशी घ्या पिकाची काळजी
- धान पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करा व पावसाच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्या.
- आवश्यक काढणी आणि मळणी लवकर उरकून घ्यावीत.
- काढणी केलेल्या सोयाबीन तसेच इतर पिकांच्या गंजी शेतात उंचवटा असलेल्या ठिकाणी साठवणूक करा.
- कापूस पीक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहेत, तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करा.
- पावसाच्या अनुषंगाने रब्बी हंगामातील पिकाच्या पेरणीला घाई करू नका.
- १५ ऑक्टोबरनंतर रब्बी हंगामातील पिकाची पेरणी करावी.
- पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
- संत्रा, मोसंबी, लिंबू तसेच इतर फळबागा, भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्या.
- पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा.
- भाजीपाला, वेलवर्गीय पिकाला पिकाची अवस्था बघून आधार द्यावा.
- मजुरांची तसेच जनावरांची काळजी घ्या.
- काम करताना विजांचा कडकडाट जाणवल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
संपादनःविजयकुमार राऊत
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023