Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला सांगलीत केले गजाआड
Aapli Baatmi October 08, 2020

नेर्ले (सांगली) : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला कासेगाव पोलिसांनी गजाआड केले. संग्राम शिवाजी गायकवाड व अस्लम मेहबूब मोकाशी दोघेही (रा.रुकडी,ता हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी हस्तगत केला.कासेगाव पोलिसांच्या कारवाईमुळे तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आठ गुन्हे केल्याची कबुली चोरट्यानी दिली.
कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी
येवलेवाडी ता. वाळवा येथील रवींद्र भगवान जाधव यांनी स्वतःची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली असल्याची फिर्याद २२ नोव्हेंबर रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पथक तयार करून येवलेवाडी ते राष्ट्रीय महामार्गावरील,परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
हेही वाचा- GOOD NEWS : लवकरच सुरू होणार कोल्हापूर-मुंबई विमानसेवा , असे आहे वेळापत्रक –
पोलिस कर्मचारी अमर जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर चोरटे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील असल्याचे समजले. संग्राम गायकवाड व अस्लम मोकाशी यांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कासेगाव, कुरळप, शिराळा, इस्लामपूर, कोल्हापूर, कराड,करवीर,आष्टा, या भागात ट्रॅक्टर चोरल्याचे कबूल केले आहे. चोरट्यांकडून दोन ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महामार्ग व ग्रामीण भागातील हॉटेल्स, पेट्रोल पंप, टोलनाके,दुकाने येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.सांगली, कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील चोऱ्या या टोळीने केल्याचे उघड झाले.पोलीस कर्मचारी बी.एच. कुंभार ,जयकर सुतार, अमर जाधव, दीपक घस्ते, राहुल पाटील यांनी तपास केला.
शेतकऱ्यांच्या मेहनतीचे यांत्रिक वाहने चोरणाऱ्याना कासेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
संपादन – अर्चना बनगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023