Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
चौकशी सुरू होती चोरीच्या गुन्ह्याची अन् त्यांनी कबुली दिली खुनाची!
Aapli Baatmi October 08, 2020

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्यासाठी थांबलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांनी एका व्यक्तीचा खून केल्याचेही समोर आले आहे.
– कर्ज मंजूर करतो म्हणाला अन् पावणे चार लाख रुपये लुटून गेला!
विशाल श्रीकांत जाधव (वय 32), गणेश यशवंत चव्हाण (वय 23), सुनील शंकर वसवे (वय 23, तिघेही रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते, एक लायटर पिस्तूल या शस्त्रांसह मिरची पावडर, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 16 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस नाईक उत्तम नंदकुमार तारू यांनी फिर्याद दिली आहे. सात ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील चौगुले इंडस्ट्रीज परिसरात तिघांना ताब्यात घेण्यात आले.
– मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते
बिबवेवाडी येथील एका व्यक्तीला वरंधा घाटात नेऊन तेथेच त्याचेवर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तेथील दरीत फेकून दिल्याचे आरोपी सांगत असल्याचे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींनी यापूर्वी पुणे-सातारा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना लुटले आहे का, जप्त करण्यात आलेला ऐवज त्यांनी कोणाकडून आणला, दरोडा टाकण्यासाठी हजर असलेला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला अटक आरोपींचा साथीदार दशरथ शिंदे आणि त्याचा मित्र याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी ऍड. जाधव यांनी केली.
– ‘सिमरन’ वेधतंय ग्राहकांचं लक्ष; मागणीमुळे दरामध्ये वाढ
तिघेही सराईत गुन्हेगार :
विशाल जाधव याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 307 नुसार एक, गणेश चव्हाण विरुद्ध 307 नुसार एक आणि इतर दोन असे तीन गुन्हे दाखल आहेत. याखेरीज, फरार आरोपी दशरथ शिंदे याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, आर्म ऍक्ट असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023