Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
'सिमरन' वेधतंय ग्राहकांचं लक्ष; मागणीमुळे दरामध्ये वाढ
Aapli Baatmi October 08, 2020

मार्केट यार्ड (पुणे) : चवीला गोड असलेल्या “सिमरन” फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. सिमरन फळ ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. तर रविवारी याची जास्त आवक होते. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार १५०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. या फळाचा हंगाम ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो.
– पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार ‘स्पेशल परीक्षा’!
दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. या फळाला शहरासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते दहा टक्क्यांनी दर जास्त आहेत. विदेशात या फळाला “परसिमन” असे म्हणतात. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या फळांचा दर्जा चांगला असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी सलीम बागवान यांनी दिली.
चीन, कोरिया, जपान, ब्राझील, यूएसए, स्पेन, इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया या देशात या फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तराखंड भागात याचे उत्पादन घेतले जाते. हे फळ खूप गोड आणि उत्कृष्ट स्वाद तसेच आरोग्यास चांगले असल्याने याला बाजारात चांगली मागणी असते.
– अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन
भारतात अनेक ठिकाणी लग्नकार्यासह, विविध कार्यक्रमात याचा “जपानी फळ” म्हणून खाण्यासाठी वापर होतो. गोड आणि उत्कृष्ट स्वादामुळे अनेक लोक खातात. या फळांमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असतात. तसेच व्हिटॅमिन ‘सी’ देखील असल्यामुळे मागणी चांगली आहे.
– सलीम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023