Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुणे जिल्ह्यात चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर
Aapli Baatmi October 09, 2020

पुणे – कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना उपचार आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. औंध, भोर, मंचर आणि दौंड येथील रुग्णालयांमध्ये हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्ह्यातील दोन लाख 96 हजार 990 कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन लाख 56 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 33 हजार 691 इतकी आहे. कोरोनाबाधित सहा हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार ‘स्पेशल परीक्षा’!
ग्रामीण भागात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खडकवासला, नऱ्हे, मंचर, कदमवाकवस्ती, वाघोली, मरकळ, चऱ्होली, म्हाळुंगे, मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी भागात बाधित रुग्णसंख्येत घट झाली आहे. खडकवासला, नऱ्हे, कदमवाकवस्ती, चऱ्होली येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. या बरे झालेल्या रुग्णांच्या समुपदेशनासाठी पोस्ट कोविड केअर सेंटर करण्यात येणार आहेत.
‘सिमरन’ वेधतंय ग्राहकांचं लक्ष; मागणीमुळे दरामध्ये वाढ
जिल्ह्यातील स्थिती –
कोरोना बाधित रुग्ण मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के
बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.36 टक्के
सध्या कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी योगा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच, पोस्ट कोविड केअर सेंटरमुळे बरे झालेल्या रुग्णांना उपचारासोबत त्यांचे समुपदेशन करणे शक्य होईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023