Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा दुरुपयोग
Aapli Baatmi October 09, 2020

नवी दिल्ली – अलीकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक दुरुपयोग झाल्याची खंत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. प्रसार माध्यमातून तबलिगी जमातची प्रतिमा खराब केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले. तसेच केंद्राकडून ठोस शपथपत्र सादर न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायधीश ए.एस.बोपन्ना, न्यायधीश व्ही. रामसुब्रह्यण्यम यांच्या पीठात जमैत उलमा ए हिंद आणि अन्य संघटनांनी याचिका दाखल केली आहे. कोविडच्या काळात माध्यमांनी तबलिगी जमातची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. देशात मुस्लिमांकडून कोरोनाचा फैलाव केला जात असल्याचे वातावरण माध्यमांनी तयार केले असून यावर न्यायालयाने बंदी घालावी, असे याचिकेत म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाचे म्हणणे
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, माध्यमांना तबलिगीच्या मुद्द्यावरून वार्तांकन करण्यापासून रोखू शकत नाही. यादरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शपथपत्र सादर करावे, असे आदेश दिले. अपप्रचार करणाऱ्या माध्यमांविरुद्ध काय कारवाई केली, याचा उल्लेख शपथपत्रात करावा, असे न्यायालयाने सांगितले.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023