Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुण्यातील ग्रुप कॅप्टन सागर परांजपे यांना दिल्लीतील कार्यक्रमात दोनवेळा संधी
Aapli Baatmi October 09, 2020

पुणे – दिल्लीतील हवाई दलाच्या संचलनाचे नेतृत्त्व पुण्यातील ग्रुप कॅप्टन सागर मधुकर परांजपे यांनी नवी दिल्ली येथे गुरुवारी केले. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले होते. हवाई दलातील एकाच अधिकाऱ्याने दोन वेळा संचलनाचे नेतृत्त्व करण्याची दुर्मिळ घटना आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतीय हवाई दलाचा ८८वा स्थापना दिवस देशभर गुरूवारी दिमाखात साजरा झाला. या निमित्ताने दिल्लीतील हवाई दलाच्या हिंडन तळावर शानदार संचलन झाले. त्याचे नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन परांजपे यांनी केले. परांजपे हे पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण अभिनव शाळेत मराठी माध्यमातून झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उत्तीर्ण होऊन १९९४ साली हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये वैमानिक म्हणून रूजू झाले. ते मिग २१च्या तुकडीत कार्यरत होते.
वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी
उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याबद्दल राष्ट्रपतींतर्फे त्याला वायू सेना मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षांपर्यंत वायुसेनेच्या संचलनाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023