Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
उस्मानाबादेत सहा बाधितांचा मृत्यू ; १०२ पॉझिटिव्हची भर
Aapli Baatmi October 09, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये १०२ नवीन रुग्णाची भर पडली आहे. सहा जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण वाढुन ८२.३३ टक्के झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण मृत्युदर ३.१८ वर गेल्याने त्याची चिंता कायम आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यामध्ये १०२ नविन रुग्णांमध्ये ७९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन १२ जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये ४१० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. तर १७२ जणाचे स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातुन १०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर ४८१ जण निगेटिव्ह आले. यातही उस्मानाबाद तालुक्याचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे. ३१ जण बाधित असुन त्यातील २५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर दोन जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. परजिल्ह्यामध्ये चौघांना लागन झाल्याची नोंद आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
परंडा तालुक्यातील २२ जणांना बाधा झाली असुन त्यातील १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एक जणाचे आरटीपीसीआरद्वारे निदान झाले आहे. दोघे परजिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. वाशी तालुक्यामध्ये १५ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असुन त्यात आठ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पाच जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. दोघे जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाल्याचे दिसुन येत आहे. उमरगा तालुक्यात दहा जाणाना लागन झाली असुन त्यातील आठ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर एक जण आरटीपीसीआरद्वारे व एक जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाल्याचे दिसुन येत आहे. कळंबमध्येही दहा जण बाधित झाले आहेत. इतर तालुक्यामध्ये एकेरी आकड्यामध्ये रुग्ण सापडल्याची नोंद आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सहा जणांचा मृत्यू
- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ६८ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.
- भुम तालुक्यातील तिंत्रज गावातील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
- उस्मानाबाद तालुक्यातील सकणेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.
- वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.
- उस्मानाबाद शहरातील भिम नगर भागामध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.
- उस्मानाबाद तालुक्यातील किणी गावच्या ७२ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. सहा जणापैकी उस्मानाबाद तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad corona update news
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023